शाळेला चाललो आम्ही...

दोन बहिणी, डोंगरातील खडतर प्रवास आणि उंच दोरखंडी पूल

राधिका आणि यशोदा यांना दररोज शाळेत ये जा करायला सहा तास प्रवास करावा असतो..

त्या दूर डोंगरात, हिमालयातील एका खेड्यात राहतात. पण तरीही त्यांचा शिकण्याचा उत्साह कमी झालेला नाही.

त्यांच्या सोबत हा प्रवास आपण 360 व्हीडिओतून करू शकतो किंवा इथे त्यांची कहाणी वाचूही शकतो.

360 व्हिडिओ - माऊस, ट्रॅकपॅड किंवा की बोर्डवरची ‘अॅरो’ची बटणं डावीकडे, उजवीकडे, वर आणि खाली करून हे पाहता येईल.

सफारी या वेब ब्राऊजरवर पाहता येणार नाही. यूट्यूब मोबाईल अॅपवर हा व्हीडिओ उत्तम दिसेल.

पावसाळ्यातली एक प्रसन्न सकाळ. पहाटेचे पाच वाजले आहेत. राधिका आणि यशोदा या बहिणी शाळेला निघण्याची तयारी करत आहेत.

नाश्त्याला कोण जास्त चपात्या खाईल, यावरून त्यांची एकमेकींशी थट्टामस्करी सुरू आहे.

त्यांची ही थट्टा मस्करी पाहिली की, त्या अर्ध्या तासात एका अतिशय खडतर अशा रोजच्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत, असं बिलकूल वाटत नाही. रोज शाळेत जाण्यासाठीचा प्रवास.

एक असा प्रवास, ज्यात दुर्गम पर्वत, घनदाट जंगल आणि प्रचंड वेगानं वाहणारी नदी ओलांडायची आहे.

रोज सगळ्यांत आधी त्या, त्यांच्या खेड्याच्या मध्यभागी असलेल्या मंदिरात जातात.

तिथे घंटा वाजवून त्या सुरक्षित प्रवासासाठी आशीर्वाद घेतात.

स्याबा या दुर्गम खेड्यात राहणाऱ्या 14 आणि 16 वर्षांच्या या दोन बहिणी शाळेत जाण्यासाठी रोज हा प्रवास करतात.

हिमालयाच्या कुशीतल्या स्याबा गावातली ही एक सुंदर सकाळ.

त्यांचे वडील ओठांवर हसू ठेवत भरल्या अंतःकरणानं त्यांना रोज निरोप देतात.

शाळेच्या मार्गावर एकेक डोंगर पार करायला दोन ते तीन तास लागतात, अर्थात किती वेळ लागेल ते हवामानाच्या स्थितीवर अवलंबून असतं.

या मुलींची शाळा दूरवरच्या मणेरी आणि माल्ला या गावांमध्ये आहे आणि तिथे पोचायचा हाच एकमेव मार्ग आहे.

भागीरथी नदीचं खोरं(गुगल मॅप्स)

भागीरथी नदीचं खोरं(गुगल मॅप्स)

उत्तराखंड राज्यात, हिमालयाच्या कुशीत वसलेल्या स्याबा या 500 लोकवस्तीच्या खेड्यात जाण्यासाठी एकही रस्ता नाही.

चिंचोळ्या मार्गावरून या मुली शाळेकडं निघाल्या आहेत. सोबत चपाती-भाजीचा डबा आणि दप्तर आहे.

आणखी दोन तासांनी त्या भागीरथी नदी ओलांडतील आणि तो त्यांच्या प्रवासातील कठीण टप्प्यांपैकी एक टप्पा असेल.

नदी ओलांडण्यासाठी असलेली ट्रॉ़ली आणि दोरखंड

नदी ओलांडण्यासाठी त्या लोखंडी ट्रॉ़लीमध्ये चढतील आणि खळाळता प्रवाह आेलांडतील.

हा प्रवास अजिबात सोपा नाही. पावसात तर जड झालेला दोरखंड ओढायला आणखी श्रम लागतात.

तसं करताना जखमा होणं नेहमीचंच आहे.

पाण्यात पडू नये म्हणून आम्हाला ट्रॉ़लीला घट्ट धरावं लागतं.”

यशोदा

त्यांचा एक चुलत भाऊ एकदा त्या दोरखंडात अडकून पाण्यात पडला होता. सुदैवानं तो वाचला.

‘’या वायरींवर लावलेल्या ग्रीसमुळे हात तर खराब होतातच, पण हाताचं ग्रीस कपड्यांना लागू नये म्हणून काळजी घ्यावी लागते,’’ यशोदा सांगते.

आमच्या युनिफॉर्मची सलवार पांढऱ्या रंगाची आहे, त्यावर डाग दिसतात.

भागीरथीच्या उत्तर किनाऱ्यावर सुरक्षित पोहोचल्यावर त्यांना पुढल्या प्रवासासाठी गाडीची वाट पाहावी लागते.

घनदाट जंगलात अस्वलं आणि बिबळ्यांची भीतीही असते.

या व्हर्च्युअल रिअॅलिटी डॉक्युमेंटरीमध्ये यशोदा आणि राधिका, प्रेक्षकांना त्यांच्या या साहसी आणि अनोख्या प्रवासात सोबत नेत आहेत.

उत्तरकाशीच्या या डोंगरांमध्ये स्याबासारखी 200 खेडी आहेत.

त्यातील काही रस्त्यानं जो़डलेली असली, तरी बहुतांश खेड्यांकडे जाण्यासाठी केवळ पायवाटाच आहेत.

दिल्लीहून भागीरथी नदीच्या क्रॉसिंग पॉइंटपर्यंतचं अंतर 400 किमी आहे. (गुगल मॅप्स)

यशोदाला (वय 16) पोलीस अधिकारी व्हायचं आहे आणि राधिकाला (वय 14) शिक्षक व्हायचं आहे.

त्यांच्या आईवडिलांचं लहान वयातच लग्न झालं. या दोघींनाही तसं करायचं नाही. त्यांना शिकायचं आहे.

यशोदाचा स्वभाव शांत आणि गंभीर आहे. राधिका बडबडी आहे. पायात अडकलेल्या जळवा काढण्यासाठी काही क्षण ती वाकते, तेवढाच वेळ ती शांत असते.

राधिका आणि यशोदा

राधिका आणि यशोदा

पावसाळ्यात चिखलभरल्या रस्त्यात भरपूर जळवा असतात.

काडेपेटीनं त्या जळवा जाळताना राधिका हसते. तिला त्या जळवांविषयी आणि रोजच्या या सहा तासांच्या प्रवासाविषयी काहीच वाटत नाही.

“मला कसलीही भीती वाटत नाही’’, ती म्हणते. बहिणीप्रमाणेच तिलाही तिचं गाव, आसपासचा निसर्ग आवडतो.

पावसाळ्यात इथे छोटे छोटे धबधबे वाहू लागतात. शहरातून आलेल्यांना तर ही दृश्यं वेडच लावतात.”

यशोदा

त्यांच्या हातात कोणा नातेवाईकाचा मोबाईल फोन आला की, यशोदा आणि राधिका त्यावर हिंदी सिनेमाची गाणी लावतात आणि त्यांच्या आवडत्या कलाकारांचा डान्स पाहतात.

या कुटुंबाकडे टीव्ही नाही़, पण काकांच्या घरात आहे. कधी कधी संपूर्ण परिवार काकांच्या घरी टीव्ही बघण्यासाठी एकत्र जमतो.

रविवारच्या या निवांत दुपारी, ‘बीबीसी’ची टीम पुढील शूटींगची आखणी करत असताना, यशोदा खाटेवर बसून फोनवर गाणी लावते आहे आणि राधिका डोक्याभोवती गुलाबी ओढणी बांधून नाचण्याची तयारी करते आहे.

“आम्ही बरीच स्वप्न पाहातो”, यशोदा म्हणते.

कधी स्वप्नात भुतं दिसतात, कधी शहरात असलेला आमचा छोटा भाऊ दिसतो. तो शहरात हॉस्टेलमध्ये राहतो. त्याची आमची भेट आठवड्याच्या अखेरीसच होते.”

स्याबातील बहुतेक मुलं आठवीनंतर शाळा सोडतात. पुढे शिकायचं असेल तर त्यांना घर सोडावं लागतं, शहरात एखादी खोली भाड्यानं घेणं हा चांगलाच खर्चिक मामला असतो.

तो सगळ्याच कुटुंबाना परवडत नाही.

राधिका आणि यशोदा त्यांच्या पालकांसोबत 

राधिका आणि यशोदा त्यांच्या पालकांसोबत 

स्याबाला जाऊन हेडसेट्समधून ही व्हर्च्युअल रिअॅलिटी डॉक्युमेंटरी या कुटुंबाला दाखवण्याचा बीबीसी टीमचा प्रयत्न आहे.

ही त्यांची फिल्म आहे… आणि या निमित्ताने त्यांच्या आईवडिलांना, आपल्या पोरींचा रोजचा शाळेचा प्रवास पाहता येईल.

या व्हर्च्युअल रिअॅलिटी डॉक्युमेंटरीमध्ये यशोदा आणि राधिका, प्रेक्षकांना त्यांच्या या साहसी आणि अनोख्या प्रवासात सोबत नेत आहेत..