Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 6

Listen to find out how to talk about where you live in English.
आपण कुठे राहतो याबद्दल कसं सांगायचं ते शिकूया.

Session 6 score

0 / 3

 • 0 / 3
  Activity 1

Activity 1

How do I talk about where I live?

या वाक्यांचा योग्य क्रम लावा.

A) I live in a town called Cambridge. It’s in England. How about you?

B) Where are you from?

C) I live in Glasgow. It’s a city in the West of Scotland.

याचं उत्तर तुम्हाला ऑ़़डियोमध्ये मिळेल.

तुमचं उत्तर तपासण्यासाठी हा ऑडियो ऐका.

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसी लर्निंग इंग्लिशच्या ‘how do I’ या मालिकेत आपलं स्वागत. मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे टॉम.

Tom
Hi everybody! Welcome to the programme!

Tejali
तुमच्या राहण्याच्या ठिकाणाबद्दल कोणी विचारलं तर उत्तर देताना कुठले शब्द, कसे वाक्प्रचार वापरायचे त्याबद्दल आज शिकणार आहोत. हेलन आणि हॅरीच्या गप्पा ऐकू. ते कुठल्या देशातले, कुठल्या गावातले आहेत काही अंदाज येतोय?

Helen
Where do you live?

Harry
I live in a town called Cambridge. It’s in England. How about you?

Helen
I live in Glasgow. It’s a city in the West of Scotland.
  
Tejali
काय समजलं यातलं? हॅरी Cambridge, England चा आहे.
I live in a town called Cambridge. It’s in England.

Tejali
हेलन Glasgow, Scotlandची आहे.
I live in Glasgow. It’s a city in the West of Scotland. 

Tom
OK so let’s take a look at the language used when asking and answering the question ‘Where do you live?’

Tejali
तू कुठे राहतोस हे विचारण्यासाठी ‘where’ म्हणजे कुठे, ‘live’ म्हणजे राहणे, ‘you’ म्हणजे तू हे शब्दं आणि ‘do’ या क्रियापदाची रूपं वापरतात.

Tom
That’s right. When both speakers answer, they begin with ‘I live in…’, then they provide   more detail about the place.

Tejali
बरोबर. एखाद्या जागेचं नाव सांगताना त्याआधी ‘a’ वापरायचं नसतं.  
I live in Glasgow.

Tejali
आपण आपल्या गावाचं वर्णन करण्यासाठी town, village, city हे शब्द तुम्ही वापरू शकता. पण ही सामान्य नामं आहेत, त्यामुळे  त्याआधी ‘a’ वापरायच.
A town, a village, a city.
      
I live in a town.
I live in Glasgow. It’s a city.

Tejali
आता हे वाक्य ऐका, यात कुठल्या शब्दावर जोर दिलाय त्याकडे लक्ष द्या.       
I live in a town called Cambridge.

Tom
In this sentence, the word ‘town’ and the name of the place, Cambridge, are stressed. Listen again.     
I live in a town called Cambridge

Tom
The first half of the sentence is unstressed and sounds like this. I live in a.
I live in a
Listen again, then repeat.
      
I live in a
I live in a town called Cambridge

Tejali
एखाद्या विशिष्ट ठिकाणाबद्दल सांगताना in theवापरतात.
It’s in the West of Scotland.

Tejali
आता इथे आपण शहराच्या नावासोबत of कसं वापरलं आहे ते लक्षात घ्या.

Tom
Listen again, which words are stressed in the sentence?
It’s in the West of Scotland.

Tom
The stressed words are ‘it’s’, ‘West’ and ‘Scotland’.

Tejali
आता याच्याशी यमक जुळणार वाक्य तयार करू.

Tom
First, ‘of’, becomes ‘of’. Let’s repeat.

of Scotland
West of Scotland.


Next, ‘in the’ becomes ‘in the’. Let’s repeat.
in the West
in the  West of Scotland.

Once again, the whole sentence!
It’s
 in the West of Scotland.

Tejali
अनौपचारीकरीत्या बोलायचं असेल तर शब्दांची छोटी रूपं बरेचदा वापरली जातात.

Tom
It’s
in the West.

Tejali
वा! बरीच माहिती देऊन झालीये. आता काय काय केल त्याचा सराव करू. हा प्रश्न ऐका आणि त्यानंतर उत्तर दया.        
Hi, where do you live?

Tejali 
ब्रिटनमध्ये बाथ नावाचं एक शहर आहे जिथे गरम पाण्याचे झरे आहेत. मी बाथमध्ये राहते असं सांगायचं असेल तर कसं सांगाल?

Tom
I live in a city called Bath.

Tejali
बरोबर आलं का तुमचं उत्तर? आता पुढचं ऐकू.      
Where is that?

Tejali
अरे याला आणखी माहिती हवी आहे. आता तुम्हाला उत्तर द्यायचंय, ते दक्षिण इंग्लंडमध्ये आहे.  

Tom
It’s in the South of England.

Tejali
आता यानंतर समोरच्याला माहिती विचारायाची असेल तर ‘how about you?’ असं विचारतात.
I live in a city in the South of England. It’s called Brighton.

Tejali
Great!बरोबर जमलं तुम्हाला.

Tom
Yes! Remember that you can practise today’s language with all your friends and family!

Tejali
आता आजच्या भागात जे शिकलो त्याचा मित्र मैत्रिणींसोबत सराव करा. आता भेटूया How do Iच्या पुढच्या भागात. Bye! 

Tom
Bye! See you next time!

 

Learn more!

1. तू कुठे राहतोस हे कसं विचाराल? 
तू कुठे राहतोस हे विचारण्यासाठी हे शब्द वापरतात:-

‘where’ म्हणजे कुठलं ठिकाण
‘live’ म्हणजे राहणे
‘you’ म्हणजे तू
आणि यासोबत ‘do’ हे क्रियापद

Where do you live?

2. तुमच्या गावाचा तपशील कसा द्याल?

सुरवात करायची  ‘I live in’

Name
मग गावाचं नाव सांगायचं. याऐवजी संदर्भानुसार देशाचं नावही सांगू शकता. नावाच्या आधी 'a' किंवा 'the' वापरायचं नाही एवढं लक्षात ठेवा.  

 • I live in Glasgow, Scotland.

नुसतं गाव, शहर किंवा खेड्यात राहतो असं म्हणायचं असेल तर city, town or village च्या आधी ‘a’ (किंवा कधी कधी ‘the’) वापरायचं.
आकाराप्रमाणे त्याचा क्रम असा आहे :-

 • I live in a city (शहर)
 • I live in a town (मोठं गाव)
 • I live in a village (खेडं) 

3. गावाच्या स्थानाचा तपशील कसा सांगायचा?
यासाठी North (उत्तर), South (दक्षिण), East (पूर्व) आणि West (पश्चिम) हे दिशादर्शक शब्द वापरावेत.

 • I live in the North.
 • It’s in the North.

जागेच्या संदर्भात वापरताना ‘It’s in the’ + North/South/East/West + of + गावाचं नाव असं म्हणायचं 

It’s in the North of England.
It’s in the West of Scotland.

How do I talk about where I live?

3 Questions

Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा. 

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

Answer these questions and tell us on our Facebook group!
या प्रश्नांची उत्तरं फेसबुक ग्रुपवर द्या! 

Where are you from?
Do you live in a city, a town or a village?
Are you from the North, East, South or West of your country?

Join us for our next episode of How do I…, when we will learn more useful language and practise your listening skills.

 

Session Vocabulary

 • I live in a
  मी ____मध्ये राहते   

  city
  शहर

  town
  छोटं गाव

  village
  खेडं

  north
  उत्तर

  south
  दक्षिण

  east
  पूर्व

  west
  पश्चिम