Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 3

Listen to find out how to talk about your likes and dislikes.
आपल्या आवडी नावडींबद्दल इंग्रजीत कसं सांगायचं ते आजच्या भागात शिकूया.  

Session 3 score

0 / 4

 • 0 / 4
  Activity 1

Activity 1

How do I talk about likes and dislikes?

हे शब्द नकारात्मक ते सकारात्मक या क्रमाने  लिहा.

 • don’t like
 • like
 • really hate
 • love
 • don’t mind

तुमचं उत्तर तपासण्यासाठी हे ऐका.

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसी लर्निंग इंग्लिशच्या ‘how do I’ या मालिकेत आपलं स्वागत. मी तेजाली, आणि माझ्यासोबत आहे सॅम.

Sam
Hello, everybody. Welcome!

Tejali
आपल्या आवडीनावडी इंग्रजीतून सांगताना, इंग्रजी कशा प्रकारे वापरायचं ते आजच्या भागात शिकणार आहोत. चला हे संभाषण ऐकुयात.

I like coffee.

I love coffee.

I don’t mind coffee. 

I really hate coffee! 

Tejali
काय काय समजलं यातलं? त्या शेवटच्या व्यक्तीला कॉफी अगदीच आवडत नाही. सॅम, कॉफी आवडते किंवा आवडत नाही हे सांगण्यासाठी कुठले शब्द वापरले ऐकूयात ?

Sam
Yes, let’s do it!

Tejali
या सगळ्यात ते कॉफीबद्दल बोलत आहेत. कॉफीबद्दल बोलताना पहिला शब्द काय वापरला?

I like coffee.

Tejali
कॉफी आवडते, यासाठी त्याने like हे क्रियापद वापरलं. Like म्हणजे आवडणे. आवडत नसेल तर त्याआधी  ‘don’t’ म्हणायचं, ‘I don’t like coffee’.

Sam
Now, let’s quickly practise the pronunciation together! 

Repeat after me:

 ‘I like coffee’.

‘I don’t like coffee’. 

Tejali
शाबास, इथे आणखी एक क्रियापद वापरलं आहे, कोणतं?

I love coffee.

Tejali
Humm. ‘Like’ पेक्षा ‘Love’ आणखी जास्त काहीतरी सांगतं का? 

Sam
Yes, it is! Let’s practise the pronunciation together. 

Repeat after me: ‘I love coffee’.

Tejali
आता दुसरी व्यक्ती काय म्हणाली ऐकूयात?        

I don’t mind coffee.

Tejali
तो म्हणाला  ‘I don’t mind’.  Don’t mind’.म्हणजे ठीक आहे किंवा चालेल. म्हणजे त्याला कॉफी खूप आवडते असं नाही आणि खूप आवडतं नाही असंही नाही. म्हणजेच likeपेक्षा हे वेगळं आहे.यासाठी ‘don’t’ वापरतात.

Sam
And let’s practise the pronunciation together.

Repeat after me: ‘I don’t mind coffee.’

Tejali
And, we have one more. शेवटची व्यक्ती कॉफीबद्दल काय म्हणाली

        
I really hate coffee!

Tejali
ती म्हणाली, ‘I really hate’. म्हणजे मला बिलकुल आवडत नाही. आपण फक्त hate वापरू शकतो पण really मुळे त्याची तीव्रता स्पष्ट होते. आपण like, love च्या आधीही ‘really’ वापरता येतं. ‘really’ मुळे मूळ भावना आणखी अधोरेखित होते.

Sam
Yes, so you can say 'I really like coffee' or ‘I really love coffee’. The way you say ‘really’ is important here, so let’s practise together. Repeat after me: ‘really’.

‘I really hate coffee!’

‘I really love coffee!’ 

Tejali           
Thanks, Sam. आता आपल्या आवडत्या, नावडत्या गोष्टींबद्दल कसं सांगायचं ते समजलंय. आता तुम्ही प्रॅक्टिस करून बघा. समज तुम्हाला चॉकलेट खूपच आवडतं; कसं सांगाल? यासोबत really वापरायचं आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही उत्तर दिल्या नंतर सॅमचं उत्तरही ऐका, आणि तुमचं उत्तर तपासून बघा.

Sam
I really love chocolate.

Tejali
Did you say the same?  तुम्हीही तेच म्हणालात का? ‘I really like chocolate’ असं म्हणू शकला असता. पण त्यातून तुम्हाल चॉकलेट खूपच जास्त आवडतं हे स्पष्ट नसतं झालं. आता समजा, तुम्हाला चॉकलेट आवडत नाही असं नाही, आवडतं असंही नाही. अशा वेळी काय म्हणाल?

Sam
I don’t like chocolate.

Tejali
Did you say the same?

Sam
Well done! Now you know how to talk about things you ‘love’, ‘like’, ‘don’t mind’, ‘don’t like’ and ‘hate’, find a friend and tell them about the foods you like and don’t like!

Tejali
Good idea! We really like it when you practise! Bye!

Sam
Bye!

 

Learn more!

 1.   ‘Like’ च्या विरुद्ध काय?
  Don’t like.

 2.  ‘Love’ and ‘hate’,‘like’ and ‘don’t like’ पेक्षा तीव्र भावना सांगतात का ?
  हो.  ‘Love’ही  ‘like’ पेक्षा तीव्र भावना दाखवतं, आणि  ‘hate’ ‘don’t like’ च्याही पुढची भावना दाखवतं.

 3.  ‘Love’ and ‘hate’ ला आणखी तीव्र करता येतं का?
  हो, ‘really’ मुळे त्या भावनेला आणखी तीव्रता येते. आणखी ठासून सांगण्यासाठी  ‘like’ आणि ‘don’t like’ च्या आधी ‘really’ वापरतात..

 4.  ‘Don’t mind’ नकारात्मक भावना आहे का?
  नाही. जरी त्यात  ‘don’t’ वापरलं असलं तरी ते नकारात्मक नाही . आपण एखाद्या बाबतीत तटस्थ असलो तर ‘don’t mind’ वापरता येतं.  

How do I talk about likes and dislikes?

4 Questions

Put the words in the correct order.
शब्दांचा योग्य क्रम लावा.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

Tell us what foods you like and dislike on our Facebook group!
तुमचा आवडत्या नावडत्या गोष्टींबद्दल आमच्या फेसबुक ग्रुपवर आम्हाला सांगा.

Join us for our next episode of How do I…, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू How do I च्या पुढच्या भागात.

Session Vocabulary

 • I like…
  मला ___आवडतं.

  I don’t like…
  मला___ आवडत नाही 

  I love…
  मला ____खूप आवडतं.  

  I hate…
  मला ____बिलकूल आवडत नाही/ मी __चा तिरस्कार करते.

  I don’t mind…

  मला ___चालतं.  

  really
  खूपच / खरंच 

  chocolate
  चॉकलेट 

  bananas
  केळी

  rice
  भात 

  beans
  द्विदल धान्य.