Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 25

Listen to find out how to talk about your abilities in English.
तुमच्या क्षमता, कौशल्य याबाबत कसं सांगाल?

Session 25 score

0 / 4

 • 0 / 4
  Activity 1

Activity 1

How do I talk about my abilities?

विरुद्धार्थी शब्द लिहा :

   good

 

 

    well

 

 

 Listen to check your answers. Then compare with the transcript below.

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसीच्या ‘How do I…’मध्ये तुमचं स्वागत, मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे सॅम. 

Sam
Hello! Welcome!

Tejali
आजच्या भागात आपण आपल्या abilities म्हणजे क्षमता, कौशल्य याबद्दल कसं सांगायचं हे शिकणार आहोत. What are you like at football? म्हणजे तुला फुटबॉल कितपत खेळता येतो? या प्रश्नाला दिलेली ही उत्तरं ऐका.

 1. 1.     I play football quite well, yeah.
 2. 2.     I'm pretty good, but my sister's better. She's very good at football!
 3. 3.     I'm really bad at football, to be honest.
 4. 4.     I play football very badly.

Sam
Who was the best at football, did you hear it?

Tejali
मला वाटतं दुसऱ्या व्यक्तीची बहीण. पण हे कसं समजलं मला? सॅम, तू सांग यांना, आपण कसं ठरवलं ते.

Sam
Let's listen again to two of the people.

Tejali
त्यांनी 'good' आणि 'bad' हे शब्द वापरले. आता परत ऐका, 'good' आणि 'bad' च्या आधी कुठलं क्रियापद वापरतात त्याकडे लक्ष द्या.          

I'm pretty good…

She's very good at football!

I'm really bad at football…

Tejali
'good' आणि 'bad' ही विशेषणं आहेत. यासोबत ‘to be’ चं योग्य ते रूप वापरतात.

Sam
Yes, they said 'she is' and 'I am'. But we naturally say 'she's' and 'I'm' when speaking. Now listen again – what little word do you hear before ‘football’?         

She's very good at football!

I'm really bad at football… 

Tejali
इथे एक छोटा शब्द वापरलाय at. तुम्हाला एखादी गोष्टी येते किंवा येत नाही याबद्दल सांगण्यासाठी त्या गोष्टीच्या आधी ‘at’ वापरायचं.


Sam
Quick practice! Repeat after me:


She's very good at football!   

I'm really bad at football. 

Shall we listen to the two other people?

 

Tejali
त्यांनी 'good' किंवा 'bad' वापरलं नाही, त्याऐवजी त्यांनी क्रियापद वापरलं. परत ऐका.           

I play football quite well, yeah.

I play football very badly.

 

Tejali
त्यांनी play हे क्रियापद वापरलं.  तुम्ही इतर कुठलंही क्रियापद क्रियापद वापरू शकता. Cook, dance, किंवा speak English. तुम्हाला how you play football विचारायचं असेल तर त्यासोबत क्रियापादासोबत तुम्हाला क्रियाविशेषणही वापरायची गरज आहे. हे परत एकदा ऐका.         

I play football quite well, yeah.

I play football very badly.

Tejali
इथे दोन शब्द वापरलेत well म्हणजे चांगलं आणि badly म्हणजे वाईट. यात आपण veryही ऐकलं. Very म्हणजे खूप. Really देखील या अर्थाने वापरतात. यासोबत तुम्ही ऐकलं quite म्हणजे बऱ्यापैकी; pretty देखील याचाच समानार्थी शब्द आहे. हे सगळे शब्द तुम्ही good किंवा badच्या आधी वापरू शकता, तसंच well आणि badlyच्या आधी सुद्धा

Sam
Let's practise the pronunciation. Repeat after me:


I play football quite well.    

I play football very badly.   

Which is absolutely true! I'm terrible at football.

Tejali
आता तुम्हाला कितपत समजलंय ते तपासायची वेळ आलीये. एखादी गोष्ट तुम्हाला बऱ्यापैकी जमते किंवा तुम्हाला एवढी जास्त पण जमत नाही; त्याबद्दल कसं सांगाल? इथे तुम्हाला च्या आधी दोन शब्द वापरायचे आहेत. कुठले ते लक्षात आहे ना? चला प्रॅक्टिस करू. आणि त्यानंतर सॅमच्या उत्तरासोबत तुमचं उत्तर तपासून पहा.  

Sam
I'm quite good at cooking.

Tejali    
Great! यासोबत तुम्हाला  'I'm pretty good at…' असंही म्हणता येईल. आता समजा तुम्हाला एखादी गोष्ट अगदीच येत नाही. कसं सांगाल?   

Sam
I'm very bad at dancing!

Tejali
आता एखादी गोष्ट जी तुम्हाला अगदी छान येते, अशी गोष्ट निवडा; आणि त्याबद्दल सांगा.

Sam
I speak English well.

Tejali
Yes, Sam, you are quite good at English.

Sam
Thank you!


Tejali
'How do I…' चे एपिसोड ऐकत राहा so you too can be ‘very good at English! Bye!

Sam
Yes, so you'll be excellent at English! Bye, everyone!

Learn more!


1. Adjectives(विशेषण) आणि nouns (नाम) वापरून आपल्या कौशल्य, क्षमतांबद्दल कसं सांगाल ?

यासाठी ‘good’ आणि  ‘bad’ही विशेषणे बरेचदा वापरली जातात. उत्तम साठी ‘excellent’ तर अतिशय वाईटसाठी  ‘terrible’ वापरतात.यासोबत ‘be’चं योग्य रूप वापरा.

वाक्यरचना : subject + be + adjective

She’s good.

We’re terrible.

एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल सांगायचं असेल तर त्याच्या आधी ‘at’ वापरा. :

वाक्यरचना : subject + be + adjective + at + noun/ gerund 

I’m bad at French.

He’s excellent at (playing) football.

2. Verbs(क्रियापदं) आणि adverbs (क्रियाविशेषणं) वापरून आपल्या कौशल्य, क्षमतांबद्दल कसं सांगाल?

‘Play’, ‘cook’, ‘dance’, ‘speak’ यासारखी क्रियापद ‘well’ किंवा ‘badly’ सारख्या क्रियाविशेषणांच्या आधी वापरून आपल्या कौशल्याबद्दल तुम्ही सांगू शकता. 

I speak French badly.
He plays football very well.

3. एखादं काम एकदम छान जमतं किंवा बिलकूल जमत नाही; असं सांगताना कुठले शब्द वापराल ?

यासाठी तुम्ही ‘good’ आणि ‘bad’ किंवा ‘well’आणि ‘badly’ च्या आधी हे शब्द वापरू शकता:

very खूप
really खरंच
quite थोडफार
pretty बऱ्यापैकी

How do I talk about my abilities?

4 Questions

Put the words in the correct order.
शब्द योग्य क्रमाने लावा.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

Would you like to come to our Facebook group for more fun with English!
तुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी आमच्यासोबत आमच्या फेसबुक ग्रुपवर यायला आवडेल का?

Join us for our next episode of How Do I...?, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Session Vocabulary

 • football
  फुटबॉल

  to play (football)
   खेळणे (फुटबॉल)

  cooking
  स्वयंपाक करणे

  to cook
  स्वयंपाक  

  dancing
  नृत्य करणे

  to dance
  नृत्य 

  to speak (a language)
  बोलणे (भाषा)