Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 14

Listen to find out how to book an appointment.
भेटीची वेळ कशी ठरवायची ते आज शिकूया.

Session 14 score

0 / 4

 • 0 / 4
  Activity 1

Activity 1

How do I book an appointment

भेटीची वेळ ठरवण्यासाठी इंग्रजीत कसं संभाषण करायचं ते या भागात  ऐका आणि या प्रश्नांची उत्तरे लिहा.

1. What day of the week is the appointment?
2. What time is the appointment?

तुमची उत्तरं तपासण्यासाठी हा ऑडीओ ऐका.

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसीच्या ‘How do I…’मध्ये  तुमचं स्वागत. मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे फिल.

Phil
Hello, everybody. Welcome!

Tejali
आजच्या भागात, भेटीची वेळ म्हणजे appointment कशी ठरवायची हे शिकणार आहोत. या संभाषणाने सुरूवात करू. ही मुलीगी भेटीची वेळ ठरवतीये. ती कसं बोलतीये ऐकूया.

Can I book an appointment for next Monday afternoon, please?

Yes, how about at 2:00 pm?

Perfect. See you then.

Tejali
काय ऐकलंत यात? जमलं का तिला भेटीची वेळ ठरवायला? हो. फिल, तिने कसं विचारलं. ते जरा सर्वांना समजावून सांग.

Phil
Yes, good idea!

Tejali
ती मुलगी म्हणाली, “तिला भेटीची वेळ ठरवायची आहे.” यासाठी कुठला प्रश्न विचारला तिने? ऐका.  

Can I book an appointment for next Monday afternoon, please?

Phil
Yes, we use the phrase ‘Can I…’ and combine it with ‘book an appointment?’ to make this request. Let’s practise it together. Repeat after me:

Can I book an appointment? 

Tejali
तिने प्रश्नात काय विचारलं? ती ‘for next Monday afternoon’ म्हणाली की ‘at next Monday afternoon’?       

Can I book an appointment for next Monday afternoon, please?

Phil
It was ‘for’ next Monday afternoon.

Tejali
Appointment घेताना त्या वेळेच्या संदर्भात ‘for’ वापरतात. पुढच्या सोमवारी म्हणजे next Monday. आणि मग ज्या वेळी हवी आहे त्याप्रमाणे म्हणतात. ‘morning’, ‘afternoon’ किंवा ‘evening’. म्हणजे पुढच्या मंगळवारी हवी असेल तर... 

Phil
You would say…

Can I book an appointment for next Tuesday evening, please?

Let’s practise the whole question together. Listen and repeat after me:

Can I book an appointment for next Monday afternoon, please?

Tejali
आता समोरची व्यक्ती काय म्हणाली ऐकूया.       

Yes, how about at 2:00 pm? 

Tejali
ती व्यक्ती म्हणाली,  “दुपारी दोन वाजता चालेल?” असं विचारताना तो म्हणाला, ‘How about 2pm?   

Phil
Let’s practise suggesting the time of the appointment. Listen and repeat after me:

How about at 2pm?   

Tejali
पण त्या मुलीला ही वेळ चालेल का?       

Perfect, see you then.

Phil
She agreed!

Tejali
ती म्हणाली हो, ‘perfect’, see you then’. म्हणजे, “चालेल, भेटू मग तेव्हा”. इथे then चा अर्थ त्या वेळी, म्हणजे दोन वाजता.

Phil
Let’s practise that final phrase. Repeat after me:

See you then!  Great, now it’s time for some practice!

Tejali
चला आता सराव करू, तुम्हाला पुढच्या बुधवारी, दुपारची वेळ ठरवायची आहे, कसं विचाराल? आणि विचारताना please म्हणा. नंतर फिल तुम्हाला त्याचं उत्तर सांगेल.

Phil
Can I book an appointment for Wednesday afternoon, please?

Tejali
शाबास, जमतंय की. आता समजा तुमच्याकडे कोणी वेळ मागतंय आणि तुम्हाला चार वाजताची वेळ योग्य वाटतीये. कसं सांगाल त्याला, विचार करा आणि नंतर उत्तरही ऐका.  

Phil
Yes, how about at 4:00pm?

Tejali
शाबास, तर तुम्हाला ही वेळ योग्य वाटत आहे. तर उत्तर देताना ‘perfect’ ने सुरूवात करा.

Phil
Perfect. See you then!

Tejali
Well done, 

Phil
Great, now you’re ready to make an appointment. 

Tejali
आणि पुन्हा भेटू ‘How do I…?’ च्या पुढच्या भागात. Bye!

Phil
Goodbye!

Learn more!

भेटीची वेळ कशी ठरवायची?

'Can I' ने विनंतीची सुरवात करून पुढे 'book an appointment'. जोडा.

 • Can I book an appointment? 

भेटण्यासाठी जी वेळ हवी आहे त्या संदर्भात 'for' वापरतात. त्यापुढे तो दिवस, वेळ यांचा संदर्भ दिला जातो. उदाहरणार्थ:

 • Can I book an appointment for next Monday afternoon?
 • Can I book an appointment for Tuesday evening?

वेळ सुचवण्यासाठी 'how about' कसं वापरायचं?
भेटीची वेळ सुचवण्यासाठी 'how about'  शब्दप्रयोग वापरतात. यासोबत वेळ सांगताना'at' वापरणं गरजेचं आहे. 

 • How about at 3pm?
 • How about at 5pm?

वेळ सुचवताना, 'how about' नंतर a gerund (v-ing form) अर्थात धातुसाधित नामाचा वापर करता येतो. Gerund म्हणजे क्रियापदापासून बनलेले नाम, आणि नंतर त्यापुढे -ing जोडायचं. म्हणजे आपण म्हणू शकतो:

 • How about meeting at 2:00pm?
 • How about drinking coffee?

(यात to meet म्हणजे भेटणे हे क्रियापद तर, meeting म्हणजे भेट हे त्यापासून बनलेले नाम आहे.)

'Then'  कसं वापरायचं?
वेळेबद्दल बोलताना 'then' वापरतात. Then म्हणजे त्या वेळी. समज कोणी म्हणालं, 'how about at 12:00pm? तर आपण म्हणू शकतो, ''see you then'', भेटू तेव्हा.

How do I book an appointment

4 Questions

Choose the correct answer.
बरोबर उत्तर निवडा.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

आमचा  फेसबुक ग्रुप नक्की जॉईन करा.
How about joining our Facebook group and learning English everyday!

Join us for our next episode of How Do I...?, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Session Vocabulary

 • book
  ठरवणे

  appointment
  भेटीची वेळ

  perfect
  अगदी योग्य

  see you then
  नंतर भेटू