Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 8

Listen to find out how to talk about someone’s personality in English.
एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल इंग्रजीत कसं बोलाल?

Session 8 score

0 / 4

 • 0 / 4
  Activity 1

Activity 1

How do I talk about someone’s personality?

हा ऑडियो ऐकण्याआधी शब्दार्थ समजून घ्या.
1. lazy
2. shy
3. quiet

आजचा ऑडियो ऐका आणि या प्रश्नांची उत्तरे द्या.
• Who in the family is lazy?
• Who in the family is quiet?
• Who in the family is shy?

तुमचे उत्तर तपासण्यासाठी हा ऑ़डियो ऐका.

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसीच्या ‘How do I…’ मध्ये तुमचं स्वागत. मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे फिल.

Phil
Hello, everybody. Welcome!

Tejali
एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगताना कुठले शब्द वापरायचे ते आजच्या भागात शिकणार आहोत. या व्यक्ती आपल्या कुटुंबातील लोकांबद्दल काय बोलतायत ऐकूया.

What's your brother like?

He’s so friendly but he’s a little lazy.

What’s your mother like?

She’s funny, but a little shy.

What’s your father like?

He’s too serious and so quiet.

Tejali
काय वाटतंय तुम्हाला याबद्दल? यात व्यक्तिमत्त्वाचं वर्णन करणारे अनेक शब्द आले आहेत. पण प्रत्येक संभाषण ‘what’s he or she like?’ याने सुरु होतं. व्यक्तीच्याव्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना ‘is like’ चा वापर होतो.

Phil
Listen carefully to the pronunciation of ‘what’s’. Listen and repeat.

What’s he like?

Tejali
Well done! आता  पहिल्या व्यक्तीने वर्णन कशा रितीने केलेलं आठवतंय का? परत ऐकूया.

He’s so friendly but he’s a little lazy.

Tejali
यात वर्णन करण्यासाठी दोन शब्द वापरले आहेत, पहिला ‘friendly,’ पण त्याआधी कुठला शब्द आलाय? ‘So’. So म्हणजे खूप. व्यक्तीच्या एखाद्या गुणाला वजन किंवा महत्त्व देण्यासाठी so वापरतात. त्यानंतर कुठला शब्द वापरलाय?

Phil
It was ‘lazy’, did you hear the word in front of this word?

Tejali
 त्यात ‘a little’ हा शब्द वापरला होता. एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा गुण थोडासा कमी आहे, हे सांगताना ‘a little’ वापरतात.

Phil
That’s right, so we can say a little lazy and a little silly. Let’s practice saying that whole sentence. Listen and repeat.

He’s so friendly but he’s a little lazy.

Tejali
Great, पुढचा संवादही त्याचं प्रश्नाने सुरू झालाय. 

What’s your mother like?

Tejali
आता त्या महिलेचं वर्णन कसं केलंय ऐकू.

She’s funny, but a little shy.

Tejali
इथे दोन शब्द वापरले आहेत, ‘funny’ आणि ‘shy’ which are different; त्यामुळे त्यासोबत आणखी एक शब्द वापरला ‘but’. दोन वेगवेगळे गुणधर्म एकत्र सांगताना but वापरतात.

Phil
Yes, so I could say that you are a little lazy, but so friendly.

Tejali
काहीही हा!

Phil
Let’s practise saying whole sentence repeat after me.

She’s funny, but a little shy.

Tejali
शेवटच्या संवादातही तोच प्रश्न विचारलाय. आणि त्याचं उत्तर आहे ...

He’s too serious and so quiet.

Tejali
आता इथे ते खूप गंभीर आहेत असं सांगण्यासाठी ‘too’ वापरलं. Too म्हणजे खूप.    

Phil
So, I can say somebody is too loud, or too old.

Tejali
आणि सर्वात शेवटी ‘too serious’ आणि ‘so quiet’. आता हे दोन्ही एकाच प्रकारचे शब्द आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत and वापरलं.

Phil
That’s right. So we can say somebody is too quiet and a little lazy.

Tejali
शाबास, वेगवेगळ्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना कुठले शब्द वापरावे लागतात ते शिकलो आपण. आता सराव करूया. असा विचार करा, कोणीतरी तुम्हाला विचारलं, तुमचा भाऊ कसा आहे?   

What’s your brother like?

Tejali
आता याचं तुम्हाला उत्तर द्यायचंय, तो मनमिळाऊ आहे, त्याला लोकांत मिसळायला आवडतं. 

He’s friendly.

Tejali
तुम्ही काय उत्तर दिलंत? आणि लोकांना हसवणाऱ्यांना काय म्हणतात?

Phil
He’s funny.

Tejali
बरोबर आलं का तुमचं उत्तर? शाबास! पण आता आपली वेळ संपत आलीये. मात्र तुम्ही सराव करत राहा, योग्य ठिकाणी ‘a little’, ‘so’, ‘too’ चा वापर करा.

Phil
Good idea! Goodbye everyone!

Tejali
पुन्हा भेटूया पुढच्या भागात, bye!

 

Learn more!

1. What does ‘be like’ mean?
‘Be like’ म्हणजे काय?
एखाद्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल विचारताना असा प्रश्न विचारतात.

• What’s he like?
• What’s she like?

2.How can I use ‘so’, ‘too’ and ‘a little’?
‘So’, ‘too’ आणि ‘a little’ कसं वापरतात?
शब्दावर जोर देण्यासाठी ‘so’ वापरतात.  ‘Very'चा अर्थही असाच होतो.
• He is so kind.

‘Too’ म्हणजे खूप जास्त.  
• She is too lazy.

‘A little’ म्हणजे थोडंस.
• He is a little shy.

3. How can we use ‘but’ and ‘and’ in a sentence?
 ‘But’ आणि  ‘and’ चा वाक्यात वापर कसा करायचा?
दोन वेगवेगळ्या प्रकारचे शब्द जोडताना  ‘but’ वापरतात तर सारखे शब्द जोडताना ‘and’ वापरतात.
• He’s so friendly, but a little quiet.
• She’s so kind and funny.

How do I talk about someone’s personality?

4 Questions

Choose the correct answer.

योग्य पर्याय निवडा.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

Can you describe the personality of somebody you know in English?
तुमच्या ओळखीच्या कोणाचं वर्णन करू शकता का? 

Tell us on our Facebook group!
आमच्या फेसबुक ग्रुपवर आम्हाला सांगा.

Join us for our next episode of How to…, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Session Vocabulary

 • What’s he/she like?
  तो/ती कशी दिसते?

  too
  खूप जास्त 

  so
  जास्त

  a little
  थोडसं

  but
  पण

  and
  आणि

  friendly
  मनमिळावू

  lazy
  आळशी

  funny
  विनोदी

  shy
  लाजाळू

  serious
  गंभीर

  quiet
  थोडं

  talkative
  गप्पीष्ट

  hardworking
  कष्टाळू