Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 7

Listen to find out how to talk about someone’s appearance in English.
एखादी व्यक्ती कशी दिसते याचं नीट वर्णन करण्यासाठी कुठले इंग्रजी शब्द वापराल? आजच्या भागात शिकूया.

Session 7 score

0 / 4

 • 0 / 4
  Activity 1

Activity 1

How do I talk about someone's appearance?

How can we give a good amount of detail when describing the appearance of people we know? Listen to today’s episode to find out!

एखादी व्यक्ती कशी दिसते याचं नीट वर्णन करण्यासाठी कुठले इंग्रजी शब्द वापराल? आजच्या भागात शिकूया.  

 

तुमचं उत्तर तपासण्यासाठी हा ऑडियो ऐका.

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसी लर्निंग इंग्लिशच्या ‘How do I’ या मालिकेत आपलं स्वागत. मी तेजाली.

Tom
And, hi everybody! I’m Tom, welcome to today’s episode of How do I.

Tejali
एखादी व्यक्ती कशी दिसते याचं वर्णन करताना इंग्रजी कशा प्रकारे वापरायचं ते आपण आजच्या भागात शिकणार आहोत. आता हे दोघे काय बोलत आहेत ऐका, एकजण तिच्या मित्राबद्दल सांगतीये, तर दुसरी तिच्या आईबद्दल सांगतीये.  


Speaker 1: What does your boyfriend look like?
Speaker 2: He's tall and has short, blonde hair.

Speaker 2: What does your mother look like?
Speaker 1: She's quite short and has long, dark hair.

Tejali
समजलं का तुम्हाला? तिच्या मित्राचे केस छोटे आणि सोनेरी आहेत, ‘short, blonde hair’.

Tom
So, let’s begin today’s lesson on appearance!

Tejali
ठीके, व्यक्ती कशी दिसते याबद्दल बोलण्यासाठी ‘Look like’ हे शब्द वापरतात. त्यामुळे हे शब्द महत्त्वाचे. ती कसं म्हणाली? तिने do किंवा does वापरलं का?

Tom
Let’s listen again to find out!

What does your boyfriend look like?
What does your mother look like?

Tejali
हे समजलं का? त्यांनी do चं तिसर रूप does वापरलं. प्रश्न विचारताना ‘he’, ‘she’ आणि ‘it’ सोबत नेहमी does वापरतात. Tom, जरा त्यांना समजावून सांगशील?  

Tom
Of course! Let’s work backwards to help with our rhythm. Repeat after me.

does your

What does your

Now let’s make it complete! Let’s add ‘mother’ and ‘look like’. ‘Mother’ and ‘look’ have strong stress.

What does your mother look like?

Tejali
शाबास, आता लवकरच तुम्हाला अगदी नीट जमेल. प्रश्नांना उत्तर देण्यासाठी be आणि have वेगवेगळी रूपं वापरतात. इथे काय वापरलं आहे समजलं? परत ऐकू. यात be चं कुठलं रूप वापरलंय?  

He's tall and has short, blonde hair.

She's quite short and has long, dark hair.

Tom
They say ‘he’s’ or ‘she’s’. The speakers are using the short form of ‘is’.

Tejali
इथे beचं is हे रूप वापरलंय. यात माणसाच्या अंगकाठीबद्दल माहिती दिली आहे. आपण वय, शरीरयष्टी, त्या व्यक्तीबद्दलच आपलं मत सांगतानाही याचा वापर करू शकतो. 

Tom
The first speaker says ‘he’s tall’. The second speaker says ‘she’s quite short’.

Tejali
Hmm, बरोबर आहे. ‘Tall’च्या विरुद्ध ‘short’. ‘Quite’ म्हणजे थोडाफार, यासाठी आणखी एक शब्द आहे ‘not very’. जेव्हा आपल्याला बुटका पण थोडाच बुटका असं म्हणायचं असतं तेव्हा म्हणतात ‘quite short’. That’s not all! आपण केसांची लांबी, त्यांचा रंग सांगताना ‘have’ वापरतो. चेहेऱ्याची ठेवण, डोळ्यांचा रंग यांचं वर्णन करतानाही ‘have’ वापरतात.
    

He's tall and has short, blonde hair

She's quite short and has long, dark hair..


Tejali
इथे ‘have’चं has हे रूप वापरलंय. He, she आणि it सोबत has वापरतात. एक लक्षात ठेवा, hair सोबत कधीही ‘a’ वापरायचं नाही, नाहीतर नुसता एक केस असा अर्थ होईल. 

Tom
OK! Now, time to practise!

Tejali
आता हे ऐकू, बरीच खुश दिसतीये ती. काय झालंय? कोणाबद्दल बोलतीये ती?

Hey! I’m so happy! I have a new boyfriend!


Tejali
तिला विचार बरं तिचा boy friend  कसा दिसतो?

Tom
What does your boyfriend look like?You could also say ‘what does he look like’?


Tejali
Hmm.. तुम्हीपण तसंच विचारलंत का? आता is आणि haveचा वापर करून प्रश्न विचारा.    

What does your best friend look like?

 
Tejali
Well done! ती थोडी बुटकी आहे आणि तिचे केस लांब आहेत हे कसं सांगाल?’

Tom
She’s quite short and has long hair.

Tejali
शाबास, ‘quite’ म्हणजे थोडं फार.

Tom
Great! So, now you know how to describe appearance, practise with some of your friends!

Tejali
आणि पुढच्या आठवड्यात 'How do I?चा नवा भाग ऐकायला विसरू नका. Bye!

Tom
Bye!

Tejali
Bye!

 

Learn more!

1. एखादी व्यक्ती कशी दिसते याचं नीट वर्णन करण्यासाठी कुठले इंग्रजी शब्द वापराल?

 एखादी व्यक्ती कशी दिसते हे सांगण्यासाठी ‘look’ हे क्रियापद वापरतात. ‘Look’ ऐवजी  ‘look like’ असाही शब्दप्रयोग करता येतो..
प्रश्नार्थक वाक्य बनवण्यासाठी यासोबत ‘do’ चं is हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात. ‘He’किंवा ‘she’, सोबत  ‘does’वापरतात.
उदाहरण:

What does he/she look like?

2. मी व्यक्तीच्या दिसण्याचं वर्णन कसं करू? 

व्यक्तीचं वर्णन करताना  ‘be’ चं  ‘is’ हे रूप वापरतात. हे be चं तिसरं रूप आहे .

उंचीबद्दल बोलतानाही ‘be’ वापरतात. यासाठी ‘Tall’ आणि ‘short’ हे शब्द नेहमी वापरतात.

He is tall.

वय, शरीरयष्टी, आपलं मत याबद्दल बोलतानाही आपण ‘be’ वापरू शकतो. यासाठी Pretty म्हणजे सुरेख आणि handsome म्हणजे देखणा. ही क्रियाविशेषणे वापरू शकतो. Pretty स्त्रियांसाठी वापरतात तर, handsome पुरुषांसाठी.

She is 25 years old.
She is pretty.
He is tall and thin.

आपण ‘quite’ हे क्रियाविशेषणही वापरू शकतो.  ‘Quite’ चा वापर त्या शब्दाची धार कमी करण्यासाठीही होतो. याचा अर्थ ‘a little bit’सारखाच आहे. ‘A little bit’ म्हणजे थोडंस. 

She is quite short.
He is quite tall.

3.  वर्णन करण्यासाठी ‘have’ वापरतात का?

केसांची लांबी, चेहेऱ्याची वैशिष्ट्ये अशा गोष्टी सांगताना  ‘have’ वापरतात. Have चं तिसर रूप has आहे.

He has short, blonde hair
She has blue eyes

Hair सोबत  ‘a’ कधीही वापरत नाहीत, आणि केसांचं वर्णन करताना आधी केसांची लांबी आणि मग रंग सांगायचा, जसं आपण म्हणतो लांब काळेभोर केस. 

How do I talk about someone's appearance?

4 Questions

Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

Can you describe the appearance of somebody you know in English?
एखादी व्यक्ती कशी दिसते हे तुम्ही इंग्रजीत सांगू शकाल?
Tell us on our Facebook group!

आमच्या फेसबुक ग्रुपवर सांगा. 

Join us for our next episode of How Do I?, when we will learn more useful language and practise your listening skills.

पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Session Vocabulary

 • mother
  आई 
  boyfriend
  प्रियकर 
  pretty
  सुरेख
  handsome
  देखणा
  long

  लांब 
  short
  छोटा, बुटका 
  blonde
  सोनेरी 
  dark
  गडद