Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 2

Listen to find out how to start a conversation when meeting new people in English.
नवीन लोकांना भेटल्यावर संभाषण कसं सुरू करायचं ते आजच्या भागात शिकूया.

Session 2 score

0 / 4

 • 0 / 4
  Activity 1

Activity 1

How do I start a conversation?

या प्रश्न आणि उत्तराच्या जोड्या लावा.

a) What’s your name?       1. I’m from Liverpool.
b) Where are you from?     2. I’m a teacher.
c) What do you do?           3. Hello, I’m Lisa.

Listen to the audio and complete the activity

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसी लर्निंग इंग्लिशच्या ‘how do I’ या मालिकेत आपलं स्वागत. मी तेजाली.

Sam
Hello, everybody. Welcome!

Tejali
समजा तुम्ही एखाद्या व्यक्तीला पहिल्यांदाच भेटलाय आणि त्या व्यक्तीशी तुम्हाला इंग्रजीत बोलायचंय; अशा वेळी  संभाषण कसं सुरु कराल? आजच्या भागात तेच शिकणार आहोत. सुरूवात करू एका छोट्याश्या संवादाने. रॉबर्ट आणि लिसा पहिल्यांदाच भेटलेत. चला ऐकू. 

Robert
Hi, my name’s Robert. What’s your name?

Lisa
Hello, I’m Lisa. Nice to meet you.

Robert
Nice to meet you, too, Lisa. Where are you from?

Lisa
I’m from Liverpool.

Robert
And what do you do?

Lisa
I’m a teacher

Tejali
समजलं का तुम्हाला हे? रॉबर्टने लिसाला तिचं नाव विचारलं, ती कुठे राहते, ती काय काम करते अशा गोष्टी विचारल्या. सॅम, कोणाशी संभाषण सुरु करण्यासाठी कसं बोलायचं ऐकूया? 

Sam
Yes, let’s!

Tejali
पहिली गोष्ट म्हणजे, आधी स्वतःची ओळख करून द्यायची, रॉबर्टने काय केलं? ऐकूयात परत.    

Hi, my name’s Robert.

Hello, I’m Lisa.
 

Tejali
एक लक्षात आलं का? लिसा म्हणाली, I’m…’ तर रॉबर्ट म्हणाला ‘My name’s…’  

Sam
And the pronunciation is important here, so let’s quickly practise - repeat after me:

‘My name’s…’
 

 ‘I’m…’
 

Tejali
वा.. आता रॉबर्ट लिसाशी त्याचं बोलणं कसं चालू ठेवतो ते ऐकू. त्यानं तिला तीन प्रश्न विचारले, कोणते? ऐकू चला.

   
What’s your name?

Where are you from?

What do you do?
 

Tejali
बरं. तर पहिला प्रश्न होता, तिचं नाव विचारणारा, नंतर तिचं गाव कुठलं आणि मग तिचा काय काम करते. कोणाशी संभाषण सुरु करताना ते तीन प्रश्न पुरेसे असतात.  

Sam
Yes, these are the most common questions to ask someone when you first meet them, so they’re very useful. But the pronunciation is important. You need to sound interested!

Tejali          
आता इथेही शब्दांचे योग्य उच्चार महत्त्वाचे. कुठल्या शब्दावर जोर देता ते महत्त्वाचं.    

Sam
Yes, so let’s quickly practise together! Repeat after me:

‘What’s your name?’ 

 ‘Where are you from?’ 

 ‘What do you do?’
 

Tejali          
आणि लिसाने उत्तर कसं दिलं? आता तुम्हाला माहिती आहे की What’s your name?’ ला दोन प्रकारे उत्तर देता येतं. आता ‘Where are you from?’ आणि ‘What do you do?’या प्रश्नांना लिसा काय उत्तर देते ऐकूयात.    

I’m from Liverpool.

I’m a teacher.


Sam
So, Lisa used ‘I’m’ to answer both questions.

Tejali
पण जर तुम्ही ‘I’m from…’ असं म्हणालात तर त्याचा अर्थ तुम्ही एखाद्या जागेबद्दल बोलताय असा होतो.

Sam
And if you say ‘I’m a…’ you’re talking about your job. Remember to use the ‘a’, as it’s important here.

Tejali          
Thanks, Sam. आता तुम्ही स्वतः सराव करायची वेळ आली आहे. हे वाक्य ऐका.

I’m from Cambridge.


Tejali          
ok. तर  'Cambridge' हे ठिकाण आहे. त्या व्यक्तीला प्रश्न काय विचारला होता? सांगा बरं.

Sam
Where are you from?

Tejali
शाबास, आता हे उत्तर ऐका.    

I’m a taxi driver.


Tejali
पण ‘a taxi driver’ हा तर व्यवसाय आहे. मग यासाठी योग्य प्रश्न कोणता?   

Sam
What do you do?

Tejali
Great!आता तुम्हाला एखाद्या व्यक्तीशी इंग्रजीत संभाषण कसं सुरु करायचं ते समजलंय  It was ‘nice to meet you’ all!

Sam
Yes, nice to meet you!

Tejali
पुन्हा भेटू  'How do I…'?च्या पुढच्या भागात bye.

Sam
Bye!

Learn more!

1.  ‘My name’s…’आणि ‘I’m…’ चा अर्थ एकाच आहे का? हो!

2.  ‘Nice to meet you’ आणि  ‘Nice to meet you, too’? कधी कधी वापरतात?
जेव्हा कोणी ‘Nice to meet you’. म्हणतं तेव्हा आपण  ‘Nice to meet you, too’  म्हणतो. ‘Too’ म्हणजे सुद्धा किंवा  ‘also’.

3.  ‘Where are you from?’ विचारताना ‘from’ गाळू शकतो का?
नाही, हा प्रश्न विचारताना ‘from’ हवंच. गाव, शहर, देश  अशा जागांबद्दल सांगताना त्या ठिकाणाच्या पुढे from वापरायचं.
I’m from London.
I’m from the U.K.
I’m from the coast  (समुद्रकिनारा ).

4. jobsच्या आधी  ‘a’वापरायला हवं का?
हो , एकवचनी नामाच्या आधी नेहमी  ‘a’ वापरावं. 

How do I start a conversation?

4 Questions

Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

Nice to meet you!
What’s your name?
Where are you from?
What do you do?

Answer these questions and tell us on our Facebook group!
या प्रश्नाचं उत्तर आम्हाला आमच्या फेसबुक पेजवर द्या.

Join us for our next episode of How do I…, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू How do I च्या पुढच्या भागात

Session Vocabulary

 • What’s your name?
  तुझं नाव काय?

  My name’s…
  माझं नाव ___आहे. 

  I’m…
  मी ___

  Nice to meet you.
  छान वाटलं तुला भेटून.

  Nice to meet you, too.
  मलाही छान वाटलं तुला भेटून.

  Where are you from?
  तू कुठली/ कुठला आहेस ?

  I’m from…
  मी ___चा आहे.

  What do you do?
  तू काय करतोस/ करतेस?

  I’m a...
  मी ___आहे.