Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 17

Listen to find out how to talk about future arrangements.
आपले बेत काय आहेत याबद्दल कसं सांगाल?  

Session 17 score

0 / 3

 • 0 / 3
  Activity 1

Activity 1

How do I talk about future arrangements?

कुठल्या वाक्यात भविष्यकालीन घटनेबद्दल सांगितलं आहे?

 1. I'll have dinner with my mother tomorrow.
 2. I'm having dinner with my mother tomorrow.
 3. I had dinner with my mother yesterday.

Listen to the audio and complete the activity

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसीच्या ‘How do I…’मध्ये  तुमचं स्वागत. मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे फिल.

Phil
Hello, everybody. Welcome!

Tejali
समजा दोन तीन दिवस मस्त सुट्टी आहे, कोणी विचारलं, काय मग, काय बेत सुट्टीचा? अशा वेळी इंग्रजीत कसं बोलायचं ते आजच्या भागात शिकूया. तू उद्या काय करणार आहेस? या प्रश्नाला तीन वेगवेगळ्या लोकांनी दिलेली उत्तर ऐकू. यातल्या कोणाचा दिवस निवांत, शांतपणे जाणार आहे ते ठरवा. 

What are you doing tomorrow?

I’m having lunch with my mother. 

I’m going to work as usual. 

I’m not doing anything. It’s my day off.

Tejali
समजलं का तुम्हाला? शेवटची व्यक्ती काहीच करणार नाहीये. तिचा उद्याचा दिवस शांत जाणार आहे.

Phil
Yes, let’s have a look!

Tejali
या सर्व वाक्यांत लोक, उद्या काय करणार आहेत, म्हणजे भविष्यातला त्यांचा बेत काय याबद्दल सांगत आहेत.

What are you doing tomorrow?

Tejali
हा present continuous tense, चालू वर्तमान काळ आहे. ‘‘What are you doing'’?

Phil
OK, let’s quickly practise the pronunciation together! Notice that when we say "What are you doing tomorrow" we pronounce 'are' as 'uh' 'What are you doing tomorrow?" Repeat after me: ‘What are you doing tomorrow’.     

‘What are you doing tomorrow’

Tejali
शाबास, आता पाहिलं उत्तर ऐकू.

I'm having lunch with my mother.

Tejali
इथे 'to be'चं 'am' हे रूप वापरतात आणि क्रियापदाला -ing जोडलं जातं. इथे मूळ क्रियापद आहे  'have' त्याचं झालं 'having'.

Phil
OK, let’s practise the pronunciation again. Notice how we say 'I am' as 'I'm'. Repeat after me:  ‘I'm having lunch with my mother.'

I'm having lunch with my mother.'

Tejali
आता पुढचं उत्तर

I'm going to work as usual.

Tejali
इथे 'I'm' बरोबर 'going' हे क्रियापद वापरलं आहे आणि त्यासोबत ‘as usual’ म्हणजे नेहमीसारखंच हेही वापरलं आहे.

Phil
And let’s practise the pronunciation together. Notice how 'to' in 'going to work' sounds like 'tuh' Repeat after me: ‘I'm going to work as usual.'

I'm going to work as usual.'

Tejali
शेवटचं उत्तर काय आहे?

I'm not doing anything. It's my day off.

Tejali
ती म्हणाली they are ‘not doing anything’. हे वाक्य नकारात्मक करण्यासाठी त्या वाक्याध्ये 'not' वापरलं. त्यासोबत तिने म्हटलं 'it's my day off'. म्हणजे तिला आज त्याला सुट्टी आहे.

Phil
When you can say 'I'm not doing anything' remember that it's important to stress the 'not'. Repeat after me: ‘I'm not doing anything’.

‘I'm not doing anything’

Tejali
Thanks Phil! आता आपण आपले बेत कसे सांगायचे ते शिकलो, आता सराव करूया. समजा तुमचा सिनेमाला जायचा बेत आहे. कसं सांगाल? विचार करा आणि सांगा.  

Phil
'I'm seeing a film at the cinema'

Tejali
Did you say the same? I am going to see a new film असंही म्हणता येईल. आता समजा कोणाला तुम्हाला त्यांचा वीकेंडचा प्लॅन काय असं विचारायचं आहे. कसं विचारलं? यासोबत तुम्हाला 'do' वापरायचं आहे. 

Phil
Are you doing anything this evening?

Tejali   
Did you say the same? शाबास, सराव करत राहा

Phil
Well done! Now you know how to talk about future arrangements!

Tejali
पुन्हा भेटूया How do I च्या पुढच्या भागात, Bye!

Learn more!

1. आपण उद्या काय करणार आहोत किंवा आपला काय बेत आहे याबद्दल सांगताना कुठला काळ वापरतात?
We use the present continuous for this. We can use the present continuous if we know that an event is definitely going to happen or we have made arrangements for it to happen.

2. या प्रकारचं वाक्य कसं तयार करायचं ?
होकारार्थी वाक्य :
I'm having dinner with my mother.
कर्ता +'be' चा चालू वर्तमानकाळ + क्रियापद आणि -ing

नकारार्थी वाक्य :
I'm not having dinner with my mother.
कर्ता +'be'चा चालू वर्तमानकाळ + not + क्रियापद आणि -ing

प्रश्न:
Are you having dinner with your mother? 
'be'चा चालू वर्तमानकाळ + क्रियापद आणि –ing?

ही लघुरूपे लक्षात घ्या.
'I am' becomes 'I'm'
'You are' becomes 'You're'
'He is' becomes 'He's'
'We are' becomes 'We're'.

3. चालू वर्तमानकाळ आणखी कुठल्या प्रकारे वापरता येतो का ?
Yes उदा. जी गोष्ट आत्ता घडत आहे त्याबद्दल बोलातानाही चालू वर्तमानकाळ वापरतात. त्यामुळे याचा वापर करताना थोडी काळजी घ्या.

How do I talk about future arrangements?

3 Questions

Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा. 

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

Tell us what you are doing this week on our Facebook group!
या आठवड्यात तुम्ही काय करणार आहात ते आमच्या फेसबुक ग्रुपवर सांगा! 

Join us for our next episode of How do I…, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Session Vocabulary

 • as usual
  नेहमीसारखं

  day off
  सुट्टी

  listen to music
  संगीत ऐकणे

  cinema
  चित्रपट