Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 11

Listen to find out how order food and drink in a restaurant.
रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर ऑर्डर कशी द्याल ?

Session 11 score

0 / 4

 • 0 / 4
  Activity 1

Activity 1

How do I order in a restaurant?

जोड्या लावा 

For              drink

For               main 

To                dessert

To                start हे ऐकून तुमची उत्तरं तपासा.

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसीच्या how do I मध्ये तुमचं स्वागत, आज आपण बोलणार आहोत रेस्टॉरंट बद्दल, मी तेजाली.

Sam
And me, Sam. Hello, everybody.

Tejali
गेल्या भागात आपण कॅफेमध्ये गेल्यावर कशी ऑर्डर करायची ते शिकलो. आज बोलणार आहोत रेस्टॉरंटबद्दल. यात थोडासा फरक असतो. तो समजून घेतला तर तुम्हाला सोपं जाईल. त्यासाठी एक संभाषण ऐकू. यात तुम्हाला soup, fish, vegetables, chocolate cake, water हे शब्द ऐकू येतील. रेस्टॉरंटमध्ये ऑर्डर देताना वेगवेगळ्या कोर्सेसबद्दल बोललं जातं. यात मुख्यत्वे starter, main course आणि dessert या कोर्सेसचा समावेश असतो. आता ऐकू.   

Waiter
Are you ready to order?

Diner
Yes! To start, I’ll have the soup, please. For main, I’ll have the fish with vegetables. And for dessert, I’ll have the chocolate cake, please.

Waiter
Of course. Anything to drink?

Diner
To drink,I’ll have water, please.

Tejali 
ऐकलंत नीट? So, Sam, shall we look at the language we can use to order in a restaurant?

Sam
Absolutely!

Tejali
तर पहिला प्रश्न विचारतात, ‘Are you ready to order?’

Sam
There are only two ways to answer this question: ‘yes’ or ‘no’! In our conversation, the answer was ‘yes’.

Tejali  
परत एकदा ऐका, प्रत्येक पदार्थाबरोबर त्याने त्या त्या कोर्सचं नाव घेतलं आहे.    
Yes! To start, I’ll have the soup, please. For main, I’ll have the fish with vegetables. And for dessert, I’ll have the chocolate cake, please.


Tejali
आता इथे कॅफे आणि रेस्टॉरंटमधला फरक लक्षात आला का? प्रत्येक कोर्सबद्दल सांगताना to start, for main, for dessert’ हे शब्द वापरले आहेत.

Sam
And then you say what you want – do you remember how?

Tejali
हो. त्यासाठी ‘I’ll have…’ म्हणतात.  

Sam
Yes, decisions in a restaurant are usually quite quick. And after ‘I’ll have…’ you say the food or drink you want.

Tejali
आणि जो पदार्थ सांगाल त्याच्या आधी the वापरतात. कारण आपण एका विशिष्ट पदार्थाबद्दल सांगतोय.

Sam
Repeat after me:

To start, I’ll have the soup, please.

For main, I’ll have the fish with vegetables.

And for dessert, I’ll have the chocolate cake, please.

Tejali
यानंतर तो तुम्हाला काही पेय हवंय का, काही प्यायला हवंय का असं विचारू शकतो, ‘Anything to drink?’

Sam
Yes – this is short for ‘would you like anything to drink? – and how do you answer it, do you remember? Let’s listen again:  

To drink, I’ll have water, please.

Tejali       
याला उत्तर देण्यासाठी ‘to start’ सारखंच ‘to drink’ वापरायचं आणि त्यानंतर ‘I’ll…’ वापरायचं. म्हणजे ‘to start I’ll have soup’.

Sam
Great! Now you’ve learned what to say in a restaurant, it’s time for you to practise.

Tejali       
आधी वेटर तुम्हाला विचारतो, तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे का? तुम्हाला सुरुवातीला सूप हवंय. आता इथे ‘for’ वापरत नाहीत हे लक्षात ठेवा. आणि please वापरायला विसरू नका.

Sam
To start, I’ll have the soup, please.

Tejali       
आता तुम्हाला मासे हवे आहेत. मग ते कसे order कराल? ऐका.

Sam
For main, I’ll have the fish.

Tejali
तुम्ही पण हेच म्हणालात का?

आता तुम्हाला पाणी हवंय, हे कसं सांगाल वेटरला? विचार करा, नंतर उत्तर ऐका.

Anything to drink?

Sam
To drink, I’ll have water, please. 

Tejali
Ok, so now you know how to order food and drink in a restaurant. आता याचा सराव करूया. ठीक आहे ?

Sam
Yes, and see you next week. Bye!

Tejali
चला, पुन्हा भेटूया पुढच्या भागात Bye!

Learn more!

1. ‘To start’ पण ‘for main’ असं का?
     ‘Start’ आणि ‘drink’ ही  क्रियापदे आहेत, त्यामुळे त्याआधी ‘to’ वापरतात. ‘Main’ आणि ‘dessert’ ही नामं किंवा वस्तू आहेत त्यामुळे त्याआधी ‘for’ वापरतात.

2. हे शब्द वाक्यात कुठे वापरतात?
    हे शब्द वाक्याच्या सुरवातीला येतात. उदा: For main, I’ll have the fish, please. किंवा पदार्थाच्या नंतरही येऊ शकतात. I’ll have the fish for main, please.

3.  ‘I want…’ सोबत कुठला शब्द वापरतात?
     हॉटेलमध्ये ऑर्डर देताना ‘I’ll have…, सोबत please’ वापरतात.
     त्यासोबत आपण Can I have…, please? किंवा I’d like…., please ही वापरू शकतो.

4. पदार्थाबद्दल सांगताना त्याआधी ‘the’ का वापरतात.
   पदार्थ ऑर्डर करताना आपण एका विशिष्ट पदार्थाबद्दल सांगत असतो त्यामुळे त्याआधी  ‘the’ वापरतात. आपण कुठल्या fish किंवा soup बद्द्दल सांगतोय ते त्यांना माहित असतं. आपण सरसकट पदार्थांबद्दल बोलत असलो तर the वापरायची गरज नाही.

How do I order in a restaurant?

4 Questions

शब्द योग्य क्रमाने लिहा.
Arrange the words in the correct order.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

What's your favourite type of restaurant? Why? Tell us on our Facebook group!
तुम्हाला कुठल्या प्रकारच्या रेस्टॉरंटमध्ये जायला आवडतं? आमच्या फेसबुक ग्रूपवर नक्की सांगा.

Join us for our next episode of How do I…, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Session Vocabulary

 • To start…
  सुरूवात करणे 

  For main…
  मेन कोर्स 

  For dessert…
  जेवणाच्या शेवटी गोड पदार्थ 

  To drink…
  पिण्यासाठी 

  I’ll have…
  मी ___घेईन.

  the soup
  सूप 

  the fish
  मासे 

  with vegetables
  भाज्या 

  the chocolate cake
  चॉकलेट केक  

  water
  पाणी