Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 1

सल्ला इंग्रजीत कसा द्यायचा? चला ऐकू.
Listen to find out how to give someone advice in English.

Session 1 score

0 / 3

 • 0 / 3
  Activity 1

Activity 1

How do I give advice?

सल्ला कसा द्यायचा?

आपल्याला ठामपणे सल्ला द्यायचा असेल तर काय वापराल, Should की have to? समजून घेण्यासाठी हे ऐका.

Listen to the audio and complete the activity

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसी लर्निंग इंग्लिशच्या ‘how do I’ या नव्या कोऱ्या मालिकेत आपलं स्वागत. मी तेजाली.

Sian
And I'm Sian.  Hello, everybody.

Tejali 
आज आपण शिकणार आहोत सल्ले द्यायला. सल्ले द्यायला सगळ्यांनाच आवडतं, पण तेच इंग्लिशमध्ये द्यायचे झाले तर? ही वाक्य ऐकू. यातलं तुम्हाला काय काय पटतंय ते बघा. नंतर मी तुम्हाला ते समजावून सांगते. आणि यातला महत्त्वाचा शब्द आहे ‘diary’ म्हणजे रोजनिशी.

You should write a diary in English.

How about watching films in English?

You have to visit BBC Learning English.

Tejali
आता इथे काही महत्त्वाच्या युक्त्या दिल्यात. यातलं कुठलं वाक्य जास्त उपयोगाचं वाटलं तुम्हाला? तर शान आता यात सल्ला देण्यासाठी कशा प्रकारे भाषा वापरली आहे बघूया?

Sian
Yes! The first speaker used the verb ‘should’. This is very common for giving advice.

Tejali
हो. आणि ‘should’ नंतर कुठला शब्द वापरला ऐकलास? Is it the verb Or the verb with ‘to’?

Sian
Let’s listen again and find out.      

You should write a diary in English.

Sian
Yes, they used the verb ‘write’ without ‘to’. So after ‘should’ you just need the verb, no ‘to’.

Tejali
म्हणजे should नंतर to वापरायची गरज नसते.

Sian
Now, let’s quickly practise the pronunciation together! Repeat after me:

should

should write        

You should write a diary.

Sian
OK, great! So now let's look at another way to give advice – we also heard 'how about..?'

Tejali
हो, पण तू 'how about..नंतर काय ऐकलंस?

Sian
Let’s listen again and find out.

How about watching films in English?

Sian
So, they used the verb ‘watching'. So after ‘how about’ you need the verb with 'ing'.

Tejali
हा, बरोबर, तर तुला क्रियापादासोबत ing वापरायचं आहे. आता याच्या उच्चारावर थोडं लक्ष द्या, हा प्रश्न आहे, त्यामुळे स्वर प्रश्नार्थक यायला हवा.

Sian      
Let’s quickly practise the pronunciation together! Repeat after me:

How about watching films?     

Tejali
Great – we have one more way to give advice, don't we?

Sian
That's right – 'have to'. But this is much stronger.

Tejali
तर, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी आग्रह करायचा असतो, किंवा ती गोष्ट समोरच्या व्यक्तीने करावीच, असं वाटत असतं तेव्हा ‘have to’ वापरतात. चला परत ऐकू. Have to नंतर क्रियापद येतं. Shall we look at the pronunciation quickly?

Sian
Yes, so 'have' and 'to' together are pronounced 'hafta'. Repeat after me: ‘hafta’.

You hafta visit.       

Tejali     
Thanks, Sian.

सल्ला देताना इंग्रजी कशा कशा प्रकारे वापरता येईल ते शिकलो आपण आत्ता. आता वेळ आलीये तुम्ही सराव करण्याची.

जरा या माणसाची अडचण ऐकता .

I have a really bad headache.

Tejali
'Headache'म्हणजे डोकेदुखी. आता आपण त्याला, औषध घ्या असं सांगू शकतो. औषधं  म्हणजे medicine, take म्हणजे घेणे.यासोबत 'should' हे क्रियापद वापरायचं का? तुम्हाला काय वाटतं? सांगा मला, त्यानंतर शान काय म्हणते ते ऐका आणि तुमचं उत्तर तपासा.   

Sian
You should take some medicine.

Tejali
Did you say the same?

आता हा माणूस काय सांगतोय ऐकू.  

I really want to get fit.

Tejali  
तर,'get fit' म्हणजे म्हणजे तंदुरुस्त होणे. आता आपण त्याला म्हणू शकतो, की जीममध्ये जा. आता इथे How about चा उपयोग करून त्याला सांगा आणि नंतर शानचं उत्तरही ऐका. 

Sian
How about joining a gym? 

Tejali
Did you say the same? 

Sian
Ok, so now you know how to give advice to your friends. I think you should practise this now – find a friend and give them some advice – nicely!

Tejali
Good idea! And how about joining us next week for more episodes of 'How do I…'? Bye! 

Sian 
Bye!

Learn more!

मित्रांना सल्ला देताना वेगवेगळ्या प्रकारे भाषा कशी वापराल?
तुम्ही म्हणू शकता

 • You should
 • How about
 • You have to

आपल्याला एखादा सल्ला ठामपणे द्यायचा असेल तर 'have to' वापरा.

या सगळ्या शब्दांनंतर क्रियापद आलं आहे का?
How about सोडून सगळ्या शब्दांनंतर क्रियापद मूळ रुपात येतं. How about नंतर क्रियापदाला ing प्रत्यय लागतो.

उदाहरणार्थ

 • You should write a diary in English.
 • You have to visit BBC Learning English
 • How about listening to music in English and learning the lyrics?

How do I give advice?

3 Questions

Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा. 

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

एखाद्याला इंग्रजी सुधारायचं असेल तर सर्वांत उत्तम सल्ला कोण? आमच्या फेसबुक ग्रुप वर सांगा. 

Tell us on our Facebook group

Join us for our next episode of How do I? when we will learn more useful language and practise your listening skills.

उत्तम इंग्रजी शिकण्यासाठी आणि तुमचं कौशल्य वाढवण्यासाठी How do I?चे पुढचे भाग नक्की ऐका. 

Session Vocabulary

 • a diary
  रोजनिशी

  a headache
  डोकेदुखी 

  take medicine
  औषध घेणे 

  get fit
  तंदुरुस्त होणे 

  a gym
  व्यायामशाळा