Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 8

Listen to find out what you can say when you don't know a word in English.
आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी शब्द माहिती नसेल तर त्या वस्तूचं वर्णन कसं करायचं ते आजच्या भागात ऐकू. 

Session 8 score

0 / 3

 • 0 / 3
  Activity 1

Activity 1

How do I describe a word I don't know?

Listen to check your answers. Then compare with the transcript below.

Show transcript Hide transcript

Tejali 
बीबीसीच्या ‘How do I…’ मध्ये तुमचं स्वागत, मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे शान.

Sian
Hi, everybody!

Tejali
कधी कधी एखाद्या गोष्टीचं नाव माहिती नसतं, मग आपण तिचं वर्णन करून सांगतो. हे असं वर्णन कसं करायचं ते आजच्या भागात समजून घेऊ. इथे तीन लोकं वेगवेगळ्या तीन गोष्टींचं वर्णन करतायंत, ऐका आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा या आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा.

 • Um, it's a kind of fruit. It's yellow and long.
 • It's an adjective and it’s the opposite of clean.
 • It's like a clock, but you wear it on your arm.

Tejali
ते कशाबद्दल बोलत होते, त्याचा तुम्हाला काही अंदाज आला का? यातली पहिली व्यक्ती बोलतीये a banana म्हणजे केळ्याबद्दल. दुसरी व्यक्ती व्यक्ती बोलतीये dirty म्हणजे घाणेरडं या विशेषणाबद्दल, तर तिसरी बोलतीये a watch म्हणजे घड्याळाबद्दल. यांना या गोष्टीँना इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते माहीत नाहीये, पण त्यांनी त्या गोष्टींचं वर्णन केलंय.

Sian
So the first person used 'it's a kind of'. You can use this phrase to talk about the category of the thing you are describing. So, for a banana, we can say 'it's a kind of fruit’. And for 'a cat' we can say 'it's a kind of animal.'

Tejali
हो, so it's a kind of…म्हणजे ते असं आहे... यात kind of  ऐवजी type हा शब्दही वापरू शकतो. So we can also say 'it's a type of'... Can't we?

Sian
That's right. So we can also say ‘it's a type of fruit'. So for 'coffee' we can say 'it's a type of drink', or 'it’s a kind of drink', and they have the same meaning.

Let’s practise the pronunciation. Repeat after me:

It's a kind of drink.

It's a type of drink.

Tejali
दुसरी व्यक्ती dirty म्हणजे घाणेरडं या विशेषणाबद्दल बोलत होती. ती म्हणाली clean म्हणजे स्वच्छच्या विरूद्ध. हे वाक्य कसं म्हटलं आठवतंय?  आपण पुन्हा एकदा नीट ऐकूया.

It’s the opposite of clean.

Sian
Yes, 'it's the opposite of…'  

So this is a useful way to describe an adjective, if you know its opposite.

So let's have a quick go – how can you describe the adjective 'cold'?  
OK, we can say: It's the opposite of hot!

Tejali
तुम्हाला नीट कळलंय ना? तिसरी व्यक्ती 'a watch' म्हणजे घड्याळाचं वर्णन करत होती. होती. ती म्हणाली एका मोठ्या घड्याळासारखी म्हणजे 'a clock'सारखी दिसणारी गोष्ट.

It's like a clock.

Sian
So we can use the phrase 'it's like' plus the thing to say that something is similar to something else. You can also use 'it's similar to'.

Let's practise the pronunciation.
Repeat after me. 

It's like a clock

It's similar to a clock.

Tejali
आता जरा सराव करूया. समजा तुम्हाला लसूण यासाठी इंग्रजी शब्द आठवत नाहीये. तुम्ही कसं सांगाल? तो एक भाजीचा प्रकार आहे, कांद्यासारखा. भाजी म्हणजे vegetables, an onion म्हणजे कांदा.

Sian
It's a kind of vegetable. It's like an onion.

Tejali
तुम्ही पण असंच म्हणालात का? तुम्ही असं पण म्हणू शकता की 'it’s a type of vegetable' and it's similar to an onion. आता समजा तुम्हाला ugly म्हणजे कुरूप हा शब्द आठवत नाहीये, पण तुम्हाला 'beautiful' शब्द आठवतोय – मग तुम्ही 'beautiful' या शब्द कसा वापराल?

Sian
It's the opposite of beautiful.

Tejali
शाबास. तुम्ही पण असंच म्हणालात का? बरं तुमच्या माहितीसाठी – लसूण म्हणजे garlic आणि आणि कुरूप म्हणजे ugly.

Sian
Well done! Now hopefully you won't feel lost without a dictionary!

Tejali
That's true! पुन्हा भेटूया How do I च्या पुढच्या भागात. Bye.

Learn more!

एखाद्या गोष्टीसाठी इंग्रजीतला शब्द माहिती नसेल तर काय करायचं?

A) त्या वस्तूचा प्रकार सांगा किंवा तिचं वर्णन करा.यासाठी तुम्ही 'it’s a kind of…' किंवा 'it's a type of…' वापरू शकता.

 • It's a kind of hot drink. (coffee)
 • It's a type of fruit. (a banana)

त्याबद्दल इतर माहिती द्या. उदा: केळं. ते लांब आणि पिवळं असतं. 'it's long and yellow'. 

B) समजा तुम्हाला विशेषण हवं असेल आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आठवत असेल तर तो सांगा. जसं की 'it's the opposite of' ....

 • It's the opposite of clean. (dirty)
 • It's the opposite of hot. (cold)

C) ती वस्तू कशासारखी दिसते या बद्दल सांगू शकता. यासाठी 'it's like…' किंवा 'it’s similar to..' वापरू शकतो.

 • It's like a clock. (a watch)
 • It's like an onion (garlic)

How do I describe a word I don't know?

3 Questions

Choose the correct option to fill the gap.
रिकाम्या जागा भरा.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

Join our facebook group, for more fun with English!
आमच्या फेसबुक ग्रुपवर नक्की भेट द्या.

Join us for our next episode of How Do I...?, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Session Vocabulary

 • garlic
  लसूण

  a clock
  घड्याळ

  a watch
  मनगटी घड्याळ

  dirty
  घाणेरडे

  ugly
  कुरूप

  beautiful
  सुंदर