Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 7

Listen to find out how to describe a scene in English.
देखाव्याचं वर्णन कसं करायचं ते आजच्या भागात ऐका. 

Session 7 score

0 / 4

 • 0 / 4
  Activity 1

Activity 1

How do I describe a scene?

सॅम एका फोटोचं वर्णन करतीये : ती जसं वर्णन करतीये तसं चित्र तुम्ही काढू शकता का? कुठल्या भागातलं चित्र आहे हे?                   

Listen to check your answers. Then compare with the transcript below.

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसीच्या How do I…मध्ये तुमचं स्वागत, मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे सॅम.  

Sam
Welcome to the programme, everyone!

Tejali
खिडकीतून तुम्हाला काहीतरी दिसलं किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात आणि अतिशय सुंदर देखावा दिसला, तर त्याचं वर्णन कसं कराल? आजच्या भागात शिकूया. आज मार्क आपल्यासाठी एका फोटोतल्या देखाव्याचं वर्णन करणार आहे.

Sam
Yes, he’s going to describe a photograph he took last year.

Tejali
त्याचं वर्णन ऐकताना तुम्हाला ‘mountains’ म्हणजे पर्वत, ‘lake’ म्हणजे ‘तळं’ आणि ‘field’  म्हणजे ‘शेत’ हे शब्द उपयोगी पडतील. त्याचं वर्णन ऐका आणि विचार करा की त्याने हा फोटो कुठे काढला असेल?

I see mountains in the background and a lake in the foreground. I see some trees at the bottom of the mountains but none at the top. On the left of the lake, I can see a field. Next to the field, I can see a house.

Tejali
Wow, किती सुंदर!! Is it England?

Sam
Very close! Mark told me it was Scotland.

Tejali
मार्कच्या फोटोंमध्ये ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्यांचं वर्णन त्याने विविध प्रकारे केलं. 

आता आपण पुन्हा ऐकूया का तो काय म्हणाला ते:

I see mountains in the background and a lake in the foreground.

Tejali
तो म्हणाला ‘in the background’ म्हणजे पार्श्वभूमीला. नंतर तो म्हणाला ‘in the foreground’ म्हणजे फोटोच्या पुढच्या बाजूला. पण हे वाक्प्रचार ठरलेले आहेत का?

Sam
Yes, so it’s always ‘in’, not ‘on’ or ‘at’, like with some of the other phrases I used. Let’s quickly practise – repeat after me:

in the background

in the foreground.

Tejali
नंतर तो झाडांबद्दल काहीतरी म्हणाला.

I see some trees at the bottom of the mountains but none at the top.

Tejali
आपण काय ऐकलं? तो म्हणाला ‘at the bottom’ म्हणजे तळाशी किंवा खाली किंवा च्याखाली. यानंतर तो ‘at the top’ म्हणाला, म्हणजे च्यावर. सॅम हे शब्द फक्त देखाव्यासाठीच वापरायचे का?

Sam
Oh, no! For example, my bedroom is at the top of the stairs, and the kitchen is at the bottom of the stairs. Notice that I said ‘of’ before ‘stairs’. Shall we practise?

Repeat after me:

at the bottom

at the top

Tejali
 पण आता मार्कने ‘on’ कसं वापर बरं? 

On the left of the lake, I can see a field.

Tejali  
आत्ता आपण ‘on the left of’ असं ऐकलं, याचा अर्थ डाव्या बाजूला. आपण एखाद्याला पत्ता सांगतो ना की नाही?

Sam
…and the opposite is, of course, ‘on the right of’. Quick practice!

Repeat after me, please:

on the left of  

on the right of

And what did Mark say at the end? 

Let’s listen again: 

Next to the field, I can see a house. 

Tejali
तो म्हणाला ‘next to’ म्हणजे च्या पुढे किंवा च्याबाजूला. 

Sam
For example, I’m sitting next to the door at the moment. Let’s say that together - ‘next to’ sounds more like one word.
Repeat after me:

I’m sitting next to the door.

Tejali
Thanks, Sam. एखाद्या वातावरणाचं किंवा गोष्टीचं वर्णन कसं करायचं हे तुम्हाला समजलंय. पण थोडा सराव करायला हवा. मी एका फोटोतल्या गोष्टींचं वर्णन करते, ते तुम्हाला इंग्रजीत सांगता येतंय का ते बघा. या चित्रात मला समोरच्या बाजूला एक घर दिसतंय. आता इथे ‘in the background’ येईल की ‘in the foreground’? ‘I see…’ ने सुरुवात करा. विचार करा आणि नंतर सॅमबरोबर तुमचं उत्तर पडताळून बघा. चला करू या सुरुवात.

Sam
I see a house in the foreground.

Tejali
Good! आता दुसर वाक्यं. मला घराच्या डाव्या बाजूला एक झाड दिसतंय. आता इथे ‘on the left of’ वापरायचं की ‘on the right of’ वापरायचं ? 

Sam
I see a tree on the left of the house.

Tejali
Well done! आता मला सांग बरं, मला झाडावर एक पक्षी दिसतोय. या वाक्यात ‘at the top of’ येईल की ‘at the bottom of’? पक्षी म्हणजे ‘bird’.

Sam
I see a bird at the top of the tree.

Tejali
Great! समजा तुम्ही फोनमध्ये नुकताच कुठला फोटो काढला आहे, त्या फोटोचं वर्णन करता; म्हणजे अ आपण आज जे शिकलोय त्याचा सराव करता येईल.

Sam
Excellent idea! Take care, everyone.

Tejali
आज इथेच थांबू, पुन्हा भेटू How do I च्या पुढच्या भागात Bye!

Learn more!

1.चित्रातल्या ठिकाणाचं वर्णन कसं करायचं?

यासाठी खालील शब्दप्रयोग वापरता येतात:

in the background पार्श्वभूमी

in the foreground पुढच्या भागात

at the bottom (of) खालच्या बाजूला, तळाशी

at the top (of) वरच्या बाजूला

on the left (of) डावीकडे

on the right (of) उजवीकडे

next to ...च्या बाजूला

2. Are prepositions at the beginning of the phrase important?

Yes! ‘In’, ‘at’ and ‘on’ are important and cannot be changed, as these are all fixed phrases.

3. यातलं शब्दयोगी अव्यय का महत्त्वाचं आहे?

Whether you use the preposition वाक्प्रचाराच्या शेवटी ‘of’ वापरायचं की नाही हे त्यानंतर आपण नाम वापरणार आहोत की नाही यावर ठरतं.

at the bottom of

I see a house at the bottom of the mountain.

at the top of

I see trees at the top of the mountain.

on the left of

The tree is on the left of the house.

on the right of

The tree is on the right of the house.

शेवटी नाम वापरायचं नसेल तर ‘of’ वापरू नका.

I see a house at the bottom.

I see trees at the top.

The tree is on the left.

The tree is on the right.

‘next to’ सोबत नेहमी नाम वापरतात. वर्णन करताना ‘to’ शिवाय ‘Next’ वापरता येत नाही.

I see a tree next to the house.

4. देखाव्याचे वर्णन करताना कुठली क्रियापदे वापरतात?

देखाव्याचं वर्णन करताना   ‘I see…’,मला दिसतंय, ‘I can see…’ मी बघू शकतो, आणि ‘There’s…’ ‘तिथे ___आहे’ किंवा ‘There are…’ तिथे ____आहेत.वापरतात.

I see a house at the bottom of the mountain.

I can see a house at the bottom of the mountain.

There’s a house at the bottom of the mountain.

How do I describe a scene?

4 Questions

Choose the correct option to fill the gap.
रिकाम्या जागा भरा.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

Join our Facebook group, to practise every day!
आमच्या फेसबुक ग्रुपवर येऊन सराव करा.

Join us for our next episode of How Do I...?, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Session Vocabulary

 • a house
  घर

  mountains
  पर्वत

  a lake
  तळं

  a field
  शेत

  a bird
  पक्षी

  a door
  दार