Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 41

Listen to find out how to tell a short story in English.
आपल्या कुटुंबाबद्दल कसं सांगायचं ते आजच्या भागात शिकू या. 

Session 41 score

0 / 3

 • 0 / 3
  Activity 1

Activity 1

How do I talk about my family?

आपल्या कुटुंबाबद्दल कसं बोलायचं? जाणून घेऊ आजच्या भागात. 

Listen to the audio and complete the activity

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसीच्या How do I…मध्ये तुमचं स्वागत, मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे फिल.

Phil
Welcome, everyone!

Tejali
आजकाल नातेसंबंध आधीसारखे राहिलेले नाहीत.आज आपण शिकणार आहोत आपल्या कुटुंबाबद्दल, कुटूंबातल्या सदस्यांबद्दल माहिती कशी द्यायची. आजच्या भागातले काही उल्लेख हे पाश्चात्य जगाशी जास्त संबंधित आहेत. पण आपल्याला शिकायला काय बिघडतंय, हो ना, चला सुरूवात करू. फिल, तुझं कुटुंब मोठं आहे का?

Phil
Not really, there are only a few of us, what about you?

Tejali
मला खूप भावंडं आहेत. दर सणसमारंभाला भेटतो आम्ही. खूप मजा येते. चला आता ही वाक्य ऐकू या.  आपल्या कुटुंबाबद्दल माहिती दिलीये यात. काय काय सांगितलंय? ऐका. त्याच्या वयाबद्दल, त्याचं लग्न झालंय का याबद्दल तो सांगतोय.

Insert
I'm married and I live with my partner. My parents live together, but my mother-in-law and my father-in-law are divorced. I have a brother and a sister. My brother is single and my sister is separated. I have a daughter and a stepson.

Tejali
यात नातेवाईकांची माहिती दिलीये, भावंडांबद्दल सांगितलंय. त्यांच्या लग्नाबद्दल काय सांगितलंय ऐका.

I'm married and I live with my partner.

Phil
Did you get that? They are married, they said that they live with their 'partner' which can mean 'husband' or 'wife' and we can also talk about partners who are not married.

Tejali
Thanks, पुढचा भाग ऐकू. कोणाचा घटस्फोट divorce झाला असेल तर त्याबद्दल कसं सांगायचं ते ऐकू आता.

My parents live together, but my mother-in-law and my father-in-law are divorced.

Phil
So, he said that their father-in-law and mother-in-law are divorced. Can you explain what –in-law means? 

Tejali
Yes, 'in-law' म्हणजे सासरचे नातेवाईक. म्हणजे सासू होते 'mother-in-law आणि सासरे होतात father-in-law.  

Phil
We can use this with any family relationship – we also have ‘son-in-law’ and ‘daughter-in-law’.

Notice the pronunciation – when the relationship word ends in a consonant, it joins to the 'in' in 'in-law'. Listen and repeat after me:

Mother-in-law

Son-in-law

Sister-in-law

Tejali
Thanks, आता पुढे ऐकू. बहीणभावंबद्दल कसं सांगायचं?

I have a brother and a sister. My brother is single and my sister is separated.

Phil
We heard that his brother is single – he's not married or in a relationship, and he doesn't have a partner. We also heard that his sister is separated. What does that mean?

Tejali
बदलत्या काळाबरोबर नातेसंबंधांचं स्वरूपही बदललं आहे. यात अनेकदा पती पत्नी रीतसर घटस्फोट म्हणजे divorce घेण्यापेक्षा वेगळ राहणं पसंत करतात. याला separated म्हणतात.

Phil
Now listen again to the last part and see if you can hear how many children he has.

I have a daughter and a stepson.

Tejali
आपण दोघांबद्दल ऐकलं. एक daughter म्हणजे मुलीबद्दल आणि नंतर stepson म्हणजे सावत्र मुलाबद्दल . Step हा शब्द कसा वापरतात ऐकू.

Phil
A stepson or stepdaughter is your partner's child from a previous relationship. Your stepfather or stepmother is your mother or father's new partner. Your stepbrother or stepsister are your stepmother or stepfather's children.

Tejali
आता हे शब्द तुम्हाला कसे वापरता येतायत का ते बघणारे मी. मला सांगा , तुमच्या सासूचं लग्न झालंय हे कसं सांगाल? हे आपल्याकडे थोडं विचित्र वाटू शकेल पण ब्रिटनमध्ये किंवा पाश्चात्या जगात हे खूप सामान्य आहे. सांगा बर कसं सांगाल ते ?

Phil
My mother-in-law is married.

Tejali
आता सांगायचंय की तुमच्या सावत्र मुलाच लग्न झालेलं नाहीये.

Phil
My stepson is single.

Tejali
आता तुम्हाला सांगायचंय की तुमचे सासरे विभक्त झालेत.

Phil
My father-in-law is separated.

Ok, thanks for listening – that's all we've got time for!

Tejali
आता तुम्हाला माहितीये आपल्या कुटुंबाबद्दल माहिती कशी द्यायची ते. आता तुम्हाला सावत्र नातेसंबंध, सासरकडचे नातेसंबंध याबद्दल कसं बोलायचं तेही लक्षात आलंय. आणि हो, कोणाच लग्न झालंय, ते divorced किंवा separated आहेत का याबद्दल बोलताना कुठले शब्द वापरायचे तेही समजलंय. आज इथेच थांबू, पुन्हा भेटू how do I च्या पुढच्या भागात. Bye.

 Learn more!

1. Partner

Partner म्हणजे जोडीदार. या संदर्भात तुमचं जोडीदाराशी लग्न झालेलं असू किंवा नसू शकतं. स्त्री किंवा पुरूष विवाहित किंवा अविवाहित जोडीदारासाठी हा शब्द वापरतात.

I've been married to my partner for ten years.

My partner and I have decided to get married.


2.  
Single, separated or divorced

Singleम्हणजे ज्याचं लग्न झालेलं नाही किंवा जो अशा कुठल्याही नातेसंबंधात नाहीये. Separated,म्हणजे विभक्त, जे आपल्या जोडीदाराबरोबर राहत नाहीत. Divorced म्हणजे घटस्फोटीत,जे कायदेशीररीत्या वेगळे झालेले आहेत.    

My brother is single, he's looking for a partner.

My parents are still married, but they've been separated for six months.

Now I'm divorced, I can marry my new partner!

3.  –in-law

आपल्या जोडीदाराच्या सासरच्या नातेवाईकांना,  –in-lawम्हणून संबोधले जाते. म्हणजे  सासू होते 'mother-in-law आणि सासरे होतात father-in-law.  
At Christmas we go to my wife's town and spend time with my mother-in-law and father-in-law.

I'm so happy that my daughter is getting married - I really like my new son-in-law.

4.   Stepfamily

Step-
 म्हणजे सावत्र. Stepsonकिंवा stepdaughter म्हणजे सावत्र मुलगा किंवा सावत्र मुलगी. Stepfather किंवा stepmother म्हणजे सावत्र वडील किंवा सावत्र आई.Stepbrother किंवा  stepsister म्हणजे सावत्र भाऊ किंवा सावत्र बहीण.

I really like my mother's new partner – it's great to have him as a stepfather.

I look after my stepson when my partner is out at work.

How do I talk about my family?

3 Questions

Choose the correct option.
योग्य उत्तर निवडा. 

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

What would you like to tell us about your family?  Come and tell us on our Facebook group. Join us for our next episode of How do I…, when we will learn more useful language and practise your listening skills.
 

तुमच्या कुटुंबाबद्दल काही सांगायचंय का तुम्हाला? आमच्या फेसबुक पेजवर येऊन सांगा आम्हाला.

पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Session Vocabulary

 • married
  विवाहीत

  single
  अविवाहीत, एकल

  separated
  वेगळे झालेले

  divorced
  घटस्फोटीत

  partner
  जोडीदार

  mother-in-law
  सासू

  stepfather
  सावत्र वडील