Unit 1: How do I 2
Select a unit
- 1 How do I 2
- 2 Unit 2
- 3 Unit 3
- 4 Unit 4
- 5 Unit 5
- 6 Unit 6
- 7 Unit 7
- 8 Unit 8
- 9 Unit 9
- 10 Unit 10
- 11 Unit 11
- 12 Unit 12
- 13 Unit 13
- 14 Unit 14
- 15 Unit 15
- 16 Unit 16
- 17 Unit 17
- 18 Unit 18
- 19 Unit 19
- 20 Unit 20
- 21 Unit 21
- 22 Unit 22
- 23 Unit 23
- 24 Unit 24
- 25 Unit 25
- 26 Unit 26
- 27 Unit 27
- 28 Unit 28
- 29 Unit 29
- 30 Unit 30
- 31 Unit 31
- 32 Unit 32
- 33 Unit 33
- 34 Unit 34
- 35 Unit 35
- 36 Unit 36
- 37 Unit 37
- 38 Unit 38
- 39 Unit 39
- 40 Unit 40
Session 19
Listen to find out how to talk about your interests in English.
आपल्या रुचीबद्दल बोलताना कसं इंग्रजी वापरायचं ते आज शिकू या.
Sessions in this unit
Session 19 score
0 / 5
- 0 / 5Activity 1
Activity 1
How do I talk about my interests?
‘तुला काय करायला आवडतं?’
हे वाक्य पूर्ण करा.
I'm interested in ________.
आता हा भाग ऐका आणि या प्रश्नाचं उत्तरं कशा प्रकारे देता येईल हे जाणून घ्या.
Listen to check your answers. Then compare with the transcript below.

Tejali
नमस्कार मित्रांनो, बीबीसीच्या 'How do I…' मध्ये तुमचं स्वागत, मी तेजाली. आणि माझ्यासोबत आहे सॅम.
Sam
Hello, everybody!
Tejali
आपल्याला काय आवडतं, आपल्याला कशात रुची म्हणजे intrest आहे याबद्दल सांगताना कुठले इंग्रजी शब्द वापरायचे ते आज शिकणार आहोत. चला ऐकू.
I'm interested in all types of art, but I like photography the most.
I'm very keen on sports! I really like anything with a ball.
I’m really into comics. Superhero comics are my favourite.
Tejali
त्यांच्यात काही साम्य जाणवलं का?
Sam
No, they all had completely different interests!
Tejali
बरोबर, एकाला कलेमध्ये रुची आहे पण त्याला फोटो काढायला सर्वांत जास्त आवडतं. दुसरा म्हणतोय, बॉल असेल ते सगळं आवडतं. तर तिसरा म्हणतोय त्याला superhero comics खूप आवडतात.
Sam
But how do we know that these are the things they like?
Tejali
आपल्या आवडीच्या गोष्टींबद्दल सांगताना त्यांनी वेगवेगळे शब्द वापरले. परत ऐकू या एकदा? म्हणजे नीट समजेल तुम्हाला .
I like photography.
I really like anything with a ball.
Sam
Easy, right? They both used the verb 'like'! And you can change 'like', so you can say 'I really like' something to make it stronger, for example.
Now let's listen to speaker one again. What does he say before 'all types of art'?
I'm interested in all types of art.
Tejali
काय वापरलंय यात? 'I'm interested in' आणि त्यानंतर पुढे म्हटलं art. I am interested in art.
Sam
Yes, 'interested' is an adjective, so we need to use the verb 'be' before it, and we use 'in' after it – always. Let's practise – repeat after me:
I'm interested in art.
You're interested in sports.
He's interested in comics.
Tejali
Thank you, Sam. नंतर आपण ऐकलं खेळ म्हणजे sports. 'sports' बद्दल काय म्हटलं त्याने?
I'm very keen on sports!
Tejali
तो काय म्हणाला 'keen on' म्हणजे खूप जास्त आवडणे, रस असणे. याचा समानार्थी शब्द आहे 'interested in', आणि हो, 'keen on' एकत्र वापरायचं.
Sam
Quick practice! Repeat after me:
I'm keen on art.
You're keen on sports.
He's keen on comics.
Shall we listen to the final speaker?
I'm really into comics.
Tejali
Hmm, आता be हे क्रियापद आपल्याला माहिती आहेच. 'Into' सोबत नेहमी be चं रूप येतं आणि त्यानंतर आपल्याला जे आवडतं त्याबद्दल आपण सांगतो. तुमचं म्हणणं ठासून सांगण्यासाठी intoच्या आधी 'really' किंवा 'very' ही वापरतात. पण हे थोडं informal आहे. हो ना सॅम?
Sam
Yes, it's used more when speaking. Let's practise the pronunciation. Repeat after me:
I'm into art.
You're really into sports.
He's very into comics.
Tejali
आता तुम्हाला किती समजलंय ते तपासायची वेळ आलीये. तुम्हाला काय आवडतं? त्याचा विचार करा आणि 'interested' वापरून वाक्य तयार करा.
आता सॅम काय म्हणतीये, ऐकू या
Sam
I'm interested in languages.
Tejali
Great! आता तुम्हाला 'keen' चा वापर करायचाय. इथे तुम्ही 'in' वापराल की 'on'? तुमचा वेळ सुरु होतोय आत्ता...
Sam
I'm keen on languages.
Tejali
शाबास, लक्षात आलं का? आता पुढे जाऊया,आता तुम्हाला वापरायचं 'into'.
Sam
I'm into languages.
Tejali
Great! आणि जर 'you're into learning English with us', आमचे भाग ऐकत राहा आणि फेसबुकवर आम्हाला follow करा. लवकरच भेटू पुढच्या भागात, 'How do I…' Bye!
Learn more!
1. क्रियापद वापरून तुमच्या रुचीबद्दल कसं सांगाल?
आपली रुची सांगण्यासाठी 'like' म्हणजे आवडणे हे क्रियापद नामाच्या किंवा धातुसाधित नामाच्या आधी वापरायचं. नामाच्या शेवटी ing येईल.
subject + like + noun/ gerund (तुमची आवड)
I like photography.
She likes swimming.
'Like' च्या आधी 'really' म्हणजे खरंच असं म्हणून आपण आपल म्हणण ठासून सांगू शकतो. इथे very नका वापरू.
I really like photography.
She really likes swimming.
2. विशेषण वापरून आपल्या रुचीबद्दल कसं सांगाल?
याचे दोन प्रकार आहेत. यासाठी विशेषण आणि शब्दयोगी अव्यय एकत्र वापरतात.
subject + be + interested in + noun/ gerund (तुमची आवड)
I'm interested in art.
She's interested in swimming.
subject + be + keen on + noun/ gerund (तुमची आवड)
I'm keen on art.
She's keen on swimming.
आपलं म्हणणं ठासून सांगण्यासाठी 'very' किंवा 'really' चा वापर करता येतो.
I'm very interested in art.
I'm really keen on art.
3. यात काही फरक आहे का?
हे शब्द औपचारिक आणि अनौपचारिक, दोन्ही प्रकारे वापरता येतात. थोडं अनौपचारिक बोलायचं असेल तर तुम्ही 'be into' वापरू शकता.
subject + be into + noun/ gerund (the interest)
I'm into art.
She's into swimming.
पुन्हा आपलं म्हणणं ठासून सांगण्यासाठी intoच्या आधी 'very' किंवा 'really' चा वापर करता येतो.
I'm very into art.
She's really into swimming.
How do I talk about my interests?
5 Questions
Choose the correct option.
योग्य पर्याय निवडा.
Help
Activity
Choose the correct option.
योग्य पर्याय निवडा.
Hint
'Very' आणि 'really'चा अर्थ ऐकाच आहे पण ते एकाच क्रियापादासोबत वापरतात का?Question 1 of 5
Help
Activity
Choose the correct option.
योग्य पर्याय निवडा.
Hint
'Interested' सोबत कुठला शब्द वापरतात?Question 2 of 5
Help
Activity
Choose the correct option.
योग्य पर्याय निवडा.
Hint
Keen कधी वापरतात?Question 3 of 5
Help
Activity
Choose the correct option.
योग्य पर्याय निवडा.
Hint
बोलीभाषेत कसं म्हणाल?Question 4 of 5
Help
Activity
Choose the correct option.
योग्य पर्याय निवडा.
Hint
'Very' ਅਤੇ 'really' ਦਾ ਅਰਥ ਇੱਕੋ ਹੀ ਹੈ।Question 5 of 5
Excellent! Great job! Bad luck! You scored:
Come to our Facebook group to tell us what you’re interested in!
तुतुमची रुची कशात आहे? आमच्या फेसबुक पेजवर सांगा.
Join us for our next episode of How Do I...?, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.
Session Vocabulary
Interests
रूचीsuperhero comics
सुपरहिरो कॉमिक पुस्तकेall types of art
सर्व प्रकारच्या कलाphotography
फोटोग्राफी