Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 15

How do I make predictions about the future?
नंतर काय घडेल याबद्दल अंदाज सांगताना कुठले शब्द वापरायचे? 

Session 15 score

0 / 4

 • 0 / 4
  Activity 1

Activity 1

How do I make predictions about the future?

घरी पोचण्याच्या वेळेबद्दल कोण नक्की आहे? 
1. I'm not sure what my plans are today but I'll be home at 10:00, I think.
2. I always finish work at 5:30 so I'm going to be home at 6:00.

Listen to check your answers. Then compare with the transcript below.

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसीच्या How do I मध्ये तुमचं स्वागत, मी तेजाली आणि माझ्या सोबत आहे सॅम.

Sam
Hello, everyone!

Tejali
आज, उद्या किंवा परवा काय काय करायचं? कुठे जायचं? कधी परत यायचं? आपण याबद्दलच्या काही शक्यता बांधत असतो, अंदाज बांधत असतो. आजच्या भागात हे ठोकताळे, या शक्यता कशा वर्तवायच्या ते आपण शिकणार आहोत. इथे दोन व्यक्ती 'be at home' म्हणजे घरी कधी जाणार याबद्दल बोलतायत. ते आपण ऐकूया. यातील पुरुष किंवा महिला याच्या दोघांपैकी कोणाचा अंदाज पक्का आहे याकडे लक्ष द्या. ऐकू या.

I'm not sure what my plans are today but I'll be home at 10:00, I think.

I always finish work at 5:30 so I'm going to be home at 6:00.

Tejali
यातील स्त्री तिच्या घरी जाण्याच्या वेळेबद्दल अधिक खात्रीपूर्वक बोलतेय. पण सॅम आपल्याला हे नक्की कसं कळणार?

Sam
Good question! It all depends o  n the grammar we use.

Tejali
बोलणारी व्यक्ती जिथे वेळेबद्दल अंदाज सांगतीये तो भाग पुन्हा ऐकू या. दोन्ही ठिकाणी त्यांनी 'be home' च्या आधी कसं व्याकरण वापरलंय ते समजून घेऊ.

Insert
I'll be home at 10:00, I think.

I'm going to be home at 6:00.

Sam
Did you hear the difference? The man used 'will' – he said 'I'll' – and the woman used 'be going to ' – she said 'I'm gonna' – before the verb 'be'. And which one was more certain?

Tejali
यातील स्त्री तिच्या घरी पोहोचण्याच्या शक्यतेबद्दल अधिक ठाम आहे, 'certain' आहे. पण हे कशावरून कळलं आपल्याला? तिने वापरलंय 'be going to', या शब्दांमुळे ती तिच्या अंदाजाबद्दल ठाम आहे हे समजतं आपल्याला. 

आपल्याकडे काही पुरावा असेल तर आपण वर्तवलेल्या शक्यतेबद्दल आपण ठाम असतो.

Sam
Yes, and what was the evidence? Let's listen again, this time try to hear why the woman is more certain and why the man is less certain.

Insert
I'm not sure what my plans are today but I'll be home at 10:00, I think.

I always finish work at 5:30 so I'm going to be home at 6:00 O'clock.

Tejali
यातील पुरुषाला जेव्हा `मला खात्री नाही’ म्हणायचंय तेव्हा तो बोलतोय 'I'm not sure' म्हणतो. त्याच्या बोलण्यात 'I think' म्हणजे मला वाटतंय असंही येतं. 'I will be home at 10:00', याबद्दल हे त्याचं नक्की नाहीये. घरी साधारण किती वाजता जाईल याबद्दल तो फक्त अंदाज बांधतोय, पण त्याबद्दल त्याला अजिबात खात्री नाही. परंतु महिला, ती मात्र तिच्या घरी पोहोचण्याच्या शक्यतेबद्दल अगदी ठाम आहे. याबद्दल ती पुरावा देते. ती सांगते ती नेहमीच साडेपाच वाजता तिचं काम संपवते. नेहमीच म्हणजे always. आणि ती ठामपणे सांगते 'going to be home at 6:00'.

Sam
So, 'will', or the negative 'won't', if you don't have evidence and 'be going to', or the negative 'be not going to' if you do have evidence. And what happens after?

Tejali
It's simple! यानंतर आपण मूळ क्रियापद वापरतो. या वाक्यांमध्ये 'be' क्रियापदाची रूपं वापरलीत, पण तुम्ही आवडेल ते क्रियापद येथे वापरू शकता!

Sam
Now, let's practise the pronunciation. Repeat after me:

I'll be home at 10:00.

I won't be home at 10:00.

I'm going to be home at 6:00. 

I'm not going to be home at 6:00.

Tejali
Great! आता तुम्हाला काय काय समजलंय ते आता पाहू या. तुम्ही खिडकीत बसलायंत, आकाश ढगाळलंय, काळं दिसतंय. पावसाची चिन्हं दिसतायत. तुम्हाला म्हणायचंय पाउस  पडेल, तर वाक्य कसं तयार कराल? इथे तुम्ही 'will' वापराल की 'going to'? तुम्हाला 'it'ने वाक्याची सुरुवात करायची आहे आणि तुमच्यासाठी क्रियापद आहे 'to rain' म्हणजे पाऊस पडणे.

Sam
It's going to rain.

Tejaliआता पुन्हा असाच अंदाज बांधूया. तुम्हाला  खिडकीतून अजूनही काळे ढग दिसतायत, पण तुम्हाला वापरायचंय be sunny, म्हणजे उजेड असेल, मग उजाडण्याचा विरुद्ध अशा रितीने तुम्हाला वाक्यं तयार करायचंय, कसं तयार कराल?  विचार करा, नंतर सॅम तुम्हाला उत्तर सांगेल.

Sam
It's not going to be sunny.

Tejali
अरे वा, मस्त. पण सॅम आपल्या How do I…च्या पुढच्या भागात लोकं आपल्याबरोबर असतील ना? तुला काय वाटतं?

Sam
Yes, absolutely! It's going to happen, so see you then, everyone.

Tejali
नक्कीच, मग पुन्हा भेटूया How do Iच्या पुढच्या भागात Bye, bye!

Learn more!

1. भविष्यातल्या गोष्टींबद्दल बोलताना कुठले शब्दप्रयोग वापरतात?
    भविष्यकाळाबद्दल बोलताना बरेचदा 'will' आणि 'be going to' वापरतात..

2. याचा वाक्यात उपयोग कसा करतात?
कर्ता + will + मूळ क्रियापद
'Will' मध्ये बदल होत नाही.  

I think I'll have two children one day.

We'll move to a smaller house when we are older.

कर्ता + be + going to + मूळ क्रियापद

एक लक्षात ठेवा, 'Be'  चं रूप क्रियापदाप्रमाणे बदलतं.

Look at the clouds! It's going to rain.

Careful, it's very icy! You're going to fall.

3. काही घडू नये असं वाटतं असेल तर वाक्य कसं तयार करायचं?

यासाठी वाक्यात 'not' चा वापर करायचा, उदा :

कर्ता + will not (won't) + मूळ क्रियापद

We won't have cars in the future. We'll all have planes.

कर्ता  + be + not + going to + मूळ क्रियापद

Look at the sky, it's sunny! It's not going to rain.

Don't worry, it's not icy. You're not going to fall.

 4. या दोन्हीमध्ये काही फरक आहे का?

We often use काही अंदाज लावतो, सर्वसाधारणपणे बोलतो तेव्हा 'will' वापरतात. ते घडण्याची आपल्याला खात्री असतेच असं नाही, त्याबद्दलचा पुरावा आपल्याकडे नसतो.

I think I'll have two children one day.

(हा फक्त आपल्या भविष्याबद्दलचा अंदाज आहे , नक्की काय घडेल सांगता येत नाही.) 

आपल्याकडे जेव्हा पुरावा असतो, आपल्याला नक्की माहिती असतं तेव्हा 'be going to' वापरतात.

Look at the clouds! It's going to rain.

(ढग दिसतायत म्हणजे पाउस पडणारच.)

असं असलं तरी भविष्यकाळाबद्दल बोलताना  दोन्हीही शब्दप्रयोग तितकेच बरोबर आहेत.

How do I make predictions about the future?

4 Questions

Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा. 

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

What predictions can you make about your future? Come and accept or refuse our offer on our Facebook group!
तुमच्या भविष्याबद्दल तुमचा काय अंदाज आहे ?आमच्या फेसबुक पेजवर सांगा.

Join us for our next episode of How Do I...?, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Session Vocabulary

 • to make a prediction
  अंदाज लावणे 

  to be home at (time)
  घरी पोहोचणे ( विशिष्ट वेळी )

  to be (more) certain
  नक्की असणे, पक्कं माहीत असणे  

  evidence
  पुरावा 

  I'm not sure
  मला नक्की माहित नाही 

  I think
  मला वाटतंय 

  always
  नेहमी
  to rain
  पाऊस पडणे  

  to be sunny
   ऊन, सूर्यप्रकाश असणे