Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 14

Listen to find out how to accept or refuse offers.
कोणी काही दिलं तर त्याचा स्वीकार कसा करायचा किंवा नम्रतेने नकार कसा द्यायचा ते अाजच्या भागात शिकू.

Session 14 score

0 / 3

 • 0 / 3
  Activity 1

Activity 1

How do I accept or refuse things?

How many people accept the offer? What do they say?
आजचा भाग ऐका; यात किती लोकांनी दिलेली गोष्ट स्विकारली आणि किती लोकांनी नकार दिला आहे? 

 

Listen to the audio and complete the activity

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसीच्या How do I मध्ये तुमचं स्वागत, मी तेजाली आणि माझ्या सोबत आहे शान.

Sian
Hello, everybody.

Tejali
चार लोकं बसलेली आहेत. त्यांना केक हवाय का असं विचारलं. एखाद्याला पदार्थ घेण्याविषयी विचारायचं असेल, तर ते कसं विचारलं जातं ते भागात पाहू. किती लोकांना केक हवाय तेही बघू.

Insert
Would you like some chocolate cake?

Yes please. That would be lovely.

I’d love some, thanks!

I’m ok thanks.

Thanks, but I'm really full.

Tejali
ऐकलंत का? चारपैकी दोघांना केक हवाय पण दोघांना नकोय. Sian, shall we look at the language they used to accept and refuse things?

Sian
Yes, so the first person said ‘yes please’ – this is a very common way to accept something.

Tejali
म्हणजे जर केक खायचा असेल तर तुम्ही फक्त ‘yes please’ असं म्हणू शकता. यात पहिली व्यक्ती ‘yes please’ नंतर काय म्हणालीये? लक्ष द्या.

Insert
Yes please. That would be lovely.

Sian
So we can say ‘that would be lovely’ or you can change the adjective to something else positive.  For example ‘That would be great’ or ‘That would be nice’. Let’s practise that. Repeat after me.

‘Yes please. That would be lovely.’

‘Yes please. That would be great.’

Tejali
केकचा तुकडा घेताना दुसरी व्यक्ती काय म्हणाली? पुन्हा एकदा ऐकू.

Insert
I’d love some, thanks!

Sian
OK so you can say ‘I’d love some, thanks’ – we use ‘some’ because here the chocolate cake is uncountable. If someone asks you if you’d like something countable – such as a cup of tea – you can say ‘I’d love one, thanks’. So let’s practise that.

‘I’d love some, thanks.’

I’d love one, thanks.’

Tejali
ओके. आता पण तुम्हाला केक खायचा नाहीये; तर नम्रतेनं नाही कसं म्हणायचं? ती  व्यक्ती `नाही’ कसं म्हणाली ते ऐकू.  

Insert
I’m ok thanks.

Sian
Exactly, so ‘I’m ok thanks’ is a much more polite way to say ‘no’. You can also say ‘I’m alright thanks’ or I’m fine thanks’ or even just ‘no thanks’.

Let's practise the pronunciation. Repeat after me.

‘I’m ok thanks.’

‘I’m alright thanks.’

‘No thanks.’

Tejali
`नाही. मला नको.’ हे एवढं सांगितलं तरी खरंतर   पुरेसं असतं. पण तुम्हाला केक का नकोय याचं छानसं आणि छोटंसं कारण दिलंत तर ते अधिक बरं दिसतं. केक नको आहे हे सांगताना शेवटची व्यक्ती काय म्हणाली? चला पुन्हा ऐकू या.

Insert
Thanks, but I'm really full.

Tejali
बघा. ती व्यक्ती म्हणाली, ‘thanks, but I’m really full’ – ‘I’m full’ म्हणजेच माझं पोट भरलेलं आहे.

Sian
Exactly, so you can give any reason you like, but remember to say ‘thanks’ first.

Tejali
Thanks, Sian. काही गोष्टी कशा स्वीकारायच्या किंवा नाकारायच्या हे तुम्हाला आता लक्षात आलंय. आता वेळ झालीये सरावाची. पहिल्या व्यक्तीने काय ऑफर केलं?

Insert
Do you want a cup of tea?

Tejali
तुम्ही चहा घेणार का – असं तुम्हाला कुणी विचारलं तर काय म्हणाल? हे दोन प्रकारे सांगता येईल. विचार करा, नंतर शान तुम्हाला उत्तर देईल. ही उत्तरं काय असतील, तुम्ही सांगू शकता?

Sian
Yes please, that would be lovely.

I’d love one, thanks.

Tejali
मस्तच! आता ह्या व्यक्तीला काय द्यायचंय ऐकूया.

Insert
Do you want some more pizza?

Tejali
सगळ्यात पहिलं आणि साधं उत्तर म्हणजे नाही. नाही म्हणताना  कारण देण्याची गरज नाही.

Sian
I’m ok thanks.

Tejali
अर्थात यापुढे तुम्ही ‘no thanks’ किंवा ‘I’m fine, thanks असं म्हणून नकार देऊ शकता. आता तुम्ही नाही म्हणताय ते ठीक आहे, पण नाही म्हणताना काहीतरी कारण दिलं तर जास्त चांगलं दिसेल. तुम्ही डाएटवर आहात असं सांगू शकता.

Sian
Thanks, but I’m on a diet.

Tejali
Well done! Now you can accept and refuse things politely. आजचा एपिसोड इथेच थांबवू या It’s time for me to get my morning cup of tea. Do you want one Sian?

Sian
I’d love one, thanks.

Tejali
चला पुन्हा भेटूया How do Iच्या पुढच्या भागात Bye!

Learn more!

1. Accepting offers

स्वीकार करण्यासाठी अनेक इंग्रजीत शब्दप्रयोग वापरतात. उदा: 

Yes please. That would be lovely.
I’d love some, thanks!

‘Yes please’
 हे सर्रास वापरलं जातं, त्यानंतर म्हणायचं ‘that would be lovely’. इथे  ‘lovely’ ऐवजी, ‘great’, ‘amazing’ किंवा ‘nice वापरता येईल..

दुसऱ्या उदाहरणात ‘I’d love some’ किंवा ‘I’d love one’वापरतात. तुम्हाला काय दिलंय त्यावर ते अवलंबून आहे.एकवचन असेल उदा. an apple,तर ‘one’ वापरा. अनेकवचन किंवा न मोजता येणारं असेल तर जसं की cake, तर ‘some’ वापरा..
त्यातअदबशीरपणा दाखवण्यासाठी शेवटी ‘thanks’, पण वापरलंय, .

2. Refusing offers – नाकारणे

यासाठीही अनेक शब्दप्रयोग आहेत. ही आहेत काही उदाहरणं :

I’m ok thanks.

Thanks, but I’m really full.

नकार देताना नम्रता महत्त्वाची, सरळ तोंडावर नाही म्हणू नये. म्हणूनच पहिल्या उदाहरणात ‘I’m ok thanks’ असं म्हटलंय.यात thanks आहे आणि ‘no’ पण. त्यामुळे आपलं बोलणं नम्र वाटतं.इथे आपण ‘I’m fine thanks’, किंवा  ‘I’m alright thanks’सुद्धा वापरू शकतो.

दुसऱ्या उदाहरणात म्हटलंय ‘Thanks, but…’. इथे पण thanks म्हटलंय पण त्यासोबत ‘butवापरलंय. यापुढे आपण कारण देऊ शकतो.

How do I accept or refuse things?

3 Questions

Choose the correct answer.
योग्य उत्तर निवडा.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

Would you like more episodes of How do I? Come and accept or refuse our offer on our Facebook group!
तुम्हाला आणखी भाग ऐकायचे आहेत का? आमच्या फेसबुक पेजवर सांगा.

Join us for our next episode of How Do I...?, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Session Vocabulary

 • a slice of cake
  केकचा तुकडा

  That would be lovely.
  मला ते नक्की आवडेल
   
  nice
  छान

  great
  महान, उत्तम 

  alright
  ठीक आहे

  I’m full.
  माझं पोट भरलंय 

  a cup of tea
  कपभर चहा

  on a diet
  डाएट