Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 13

Listen to find out how to talk about possible situations in the future in English.
नजीकच्या भविष्यात काय परिस्थिती असेल याबद्दल कसं बोलायचं ते आजच्या भागात शिकू.

Session 13 score

0 / 3

 • 0 / 3
  Activity 1

Activity 1

How do I talk about possible situations in the future?

विकेंडचे प्लॅन कशावर अवलंबून आहेत?

1. If it's sunny this weekend, I could go for a bike ride!
2. If it's sunny, I might go shopping.
3. If it's sunny, I may go to the beach.
4. If it's sunny, I'll relax in the garden.

 

Listen to check your answers. Then compare with the transcript below.

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसीच्या How do I…मध्ये तुमचं स्वागत आहे, मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे सॅम.

Sam
Hello!

Tejali
भविष्यकाळातल्या घटनांबद्दल, म्हणजेच पुढे घडणाऱ्या घटनांविषयी आपण सगळेचजण बोलत असतो. म्हणजे अमुक झालं तर मी हे करीन तमुक झालं तर ते करीन. तर त्यासाठीची नेमकी वाक्यरचना कशी करतात ते आजच्या भागात ऐकणार आहोत. एखाद्या वीकेण्डविषयी काही लोकं बोलतायंत, तर ते कसं बोलतायंत ते ऐकू या. ही वाक्य ऐकुया. लोकांचे वीकेण्डचे प्लॅन नेमके कुठल्या कुठल्या गोष्टींवर अवलंबून आहेत ते. नीट लक्ष द्या.

 1. 1.     If it’s sunny this weekend, I could go for a bike ride!
 2. 2.     If it’s sunny, I might go shopping.
 3. 3.     If it’s sunny, I may go to the beach.
 4. 4.     If it’s sunny, I’ll relax in the garden.

Tejali
आलं का लक्षात? जर छान ऊन पडलं असेल तर लोकं बाहेर पडून, त्यांनी ठरवलेल्या गोष्टी करतील.

Sam
Yes, they all said ‘if it’s sunny’ and the important word here is ‘if’.

Tejali
एक लक्षात ठेवा ‘if’ बरोबर क्रियापदाचं वर्तमानकाळी रूप वापरतात.

Sam
Yes, and you can use any verb in the present after ‘if’ – ‘if it rains’, ‘if you’re late’, ‘if he comes’... But, what happens in the other part of the sentence? 

Tejali
येथे दोन क्रियापदं एकत्र वापरलीत. पहिली व्यक्ती काय म्हणाली? ‘go for a bike ride’. पण तिने `go’ च्या आधी कोणते क्रियापद वापरले?

If it’s sunny this weekend, I could go for a bike ride! 

Tejali
इथे वापरलंय ‘could’ . यातून काय दिसतं? तर दिवसा ऊन पडलेलं असेल तर सायकल चालवायला जाता येईल. एक लक्षात ठेवा ‘could’ नंतर क्रियापदाचं मूळ वापरायचं.

Sam
Yes, any verb, and the pronunciation is ‘could’. Let’s try that:

…could go…

If it’s sunny, I could go for a bike ride.

Tejali
आता दुसरी व्यक्ती काय म्हणाली ते पाहू, ‘go’च्या आधी कुठलं क्रियापद वापरलं?

If it’s sunny, I might go shopping.

If it’s sunny, I may go to the beach.

Tejali
एखाद्या गोष्टीची शक्यतेबद्दल बोलताना may किंवा might वापरतात. दोन्हीचा अर्थ सारखाच आहे, त्यामुळे हे दोन्ही interchangeable आहेत. यातून एखाद्या गोष्टीची शक्यता आपल्याला दिसते. आणि अर्थात त्यानंतर तुम्ही मूळ क्रियापद वापरून तुम्ही वाक्य पुढे नेऊ शकता.

Sam
And let’s look at the pronunciation together. Repeat after me:

…might go…

If it’s sunny, I might go shopping. 

…may go…

If it’s sunny, I may go to the beach.

Tejali
Thanks, Sam. चला आपण आता तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं ऐकू या. ही व्यक्ती ‘relax’ क्रियापद वापरण्यापूर्वी ते काय म्हणाली ते ऐका. 

If it’s sunny, I’ll relax in the garden. 

Tejali
ती व्यक्ती म्हणाली, ‘I’ll’. ‘I’ll’ हा ‘I will’ याचा शॉर्ट फॉर्म आहे. त्या दिवशी जर ऊन पडलेलं असेल तर ते त्यांच्या बागेत बसून अगदी छान आराम करतील. ऊन पडलेलं असेल तर त्यांचा हा प्लॅन अगदी नक्की आहे. ‘Could’, ‘may’ किंवा ‘might’ याचा वापर शक्यातेसाठी होतो, पण will  म्हणजे करणारच, अगदी पक्क.

Sam
Quick practice of pronunciation:

I’ll relax…

If it’s sunny, I’ll relax in the garden.

Tejali
Great! आता थोडा सराव करू या. जर छान ऊन पडलेलं असेल तर तुम्ही धावायला जाल? ते सांगा बरं. तुमच्याकडे ‘go running’ पूर्वी वापरण्यासाठी तीन पर्याय आहेत. सॅम तुम्हाला  उत्तरं सांगेल, तुम्ही उत्तरं तिच्या उत्तराशी पडताळून पाहा. याची तुम्हाला सुरूवात करायचीये, If it’s sunny… 

Sam
If it’s sunny, I could go running.

If it’s sunny, I might go running.

If it’s sunny, I may go running.

Tejali
Great! आता थोडं वेगळं उदाहरण घेऊ. तुमचं काम जर आटपल्यावर तुम्ही घरी लवकर जाल हे सांगायचंय. विचार करा आणि उत्तर द्या, नंतर सॅमचं उत्तरही ऐका. यासाठी तुम्हाला म्हणायचं If I finish my work…

Sam
If I finish my work, I’ll go home early.

That's a great idea, let’s go home!

Tejali
Only if you finish your work, Sam…

Sam
Oh, ok.

Tejali
Bye. पुन्हा भेटूया How do I च्या पुढच्या भागात.

Sam
Bye, everyone!

Learn more!

1.'If' चा अर्थ काय?

If' म्हणजे जर. वाक्याच्या 'if' भागावर इतर वाक्य अवलंबून असतं, ती वाक्यातली अट असते. याचा वापर वेगवेगळा परिस्थितीच वर्णन करण्यासाठी होऊ शकतो. आजच्या भागात आपण फक्त भविष्य काळाबद्दलच विचार करणार आहोत. याचं वाक्य बनवताना 'if' नंतर क्रियापदाच वर्तमानकाळी रूप येतं.

 • If it rains
 • If you're late…
 • If he comes

2. वाक्याचा अटदर्शक भाग, ज्यात'if' चा वापर होतो, त्याचं वर्णन कसं करणार ?
आपल्याया काय सांगायचं आहे, त्याप्रमाणए वाक्यातली अट वेगवेगळ्या प्रकारे सांगता येते.

 • could/ might/ may + base verb = असं काही जे शक्य आहे.

  If it's sunny, I might go shopping.
  If it's sunny, I may go to the beach.
 • will + base verb =असं काही जे नक्की आहे.

  If it's sunny, I'll relax in the garden.

3. आपण नकारार्थी वाक्यं तयार करू शकतो का?
 यासाठी वाक्याच्या 'not' in both parts of the sentence.

• If it isn't sunny this weekend, I might stay at home.
• It if rains this weekend, I won't go to the beach.

4. वाक्याची रचना बदलू शकतो का?
Absolutely! अर्थ न बदलताही वाक्यांच्या भागांची आपण अदलाबदल करू शकतो, पण एक लक्षात ठेवा की वाक्याची सुरूवात 'if' ने होत नसेल तर स्वल्पविराम वापरू नये.

• If it's sunny, I might go shopping.
• I might go shopping if it's sunny.

How do I talk about possible situations in the future?

3 Questions

Choose the correct option to fill the gap.
रिकाम्या जागा भरा.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

What will you do this weekend if it's sunny? Come and tell us on our Facebook group!
तुमचा विकेंड कसा होता ते आमच्या फेसबुक पेजवर सांगा.

Join us for our next episode of How Do I...?, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Session Vocabulary

 • go for a bike ride
  सायकल चालवायला जाणे 

  go shopping
  खरेदीला जाणे

  go to the beach

  किनाऱ्यावर जाणे 

  relax in the garden
  बागेत आराम करणे