Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 12

Listen to find out how to talk about things you have permission to do and things you don’t have permission to do.
तुम्हाला कशाची परवानगी आहे किंवा नाही याबद्दल कसं बोलायचं ते आजच्या भागात शिकूया.

Session 12 score

0 / 3

 • 0 / 3
  Activity 1

Activity 1

How do I talk about permission at work?

या दोन्ही वाक्यांचा अर्थ सारखाच आहे का?

• I can wear jeans to work.

• I'm allowed to wear jeans to work.

Listen to check your answers. Then compare with the transcript below.

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसीच्या How do I…मध्ये तुमचं स्वागत आहे, मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे शान.

Sian
Hello, everybody.

Tejali
लोकं विविध गोष्टी करताना परवानगी मागतात, कधी सहजतेने तर कधी मुद्दाम. काही गोष्टी विचारून करणे गरजेचे असते. एखाद्या गोष्टीची परवानगी आहे किंवा  परवानगी नाही, याबद्दलची माहिती देताना कसं बोलायचं, ते आजच्या भागामध्ये शिकणार आहोत. लोकांना एखादं काम करण्यासाठी जेव्हा परवानगी मागायची असते तेव्हा ते कसं बोलतात, ते समजून घेउया. आता या वाक्यांकडे नीट लक्ष द्या.

We can wear jeans but we can't wear shorts.

We're allowed to finish early on a Friday.

We're not allowed to smoke inside.

Tejali
कळलं का तुम्हाला हे? तिसरी व्यक्ती सांगतीये स्मोकिंग बद्दल. त्याला धूम्रपानाची परवानगी नाही. ज्या गोष्टी करण्याची परवानगी आहे, त्याबद्दल लोकं कशा प्रकारे बोलतात, नेमकी कशी भाषा वापरतात? शान बोलूया त्याबद्दल?

Sian
Yes, so the first person used the verb 'can'. But can you remember what followed 'can'? Was it 'to' plus the verb or was it just the verb? Let's listen again to find out.

We can wear jeans but we can't wear shorts.

Tejali
अच्छा, 'can' नंतर जे क्रियापद ते त्याच्या मूळ रूपात वापरतात पण त्यासोबत 'to' वापर त नाही. आणि ज्या गोष्टीची तुम्हाला परवानगी नाही अशा गोष्टीबद्दल सांगताना आपण ‘cannot’ चं लघुरूप 'can't' वापरू शकतो.

Sian
Yes, and 'can' is a modal verb so it doesn't change its form. So we say, 'I can', 'you can', 'we can'. Let's quickly look at the pronunciation. So the positive form 'can' is not normally stressed in a sentence so it becomes 'can'. Repeat after me:

can  

can wear jeans  

We can wear jeans.

Tejali
Great! म्हणजे बोलताना 'can' वर जोर दिला जात नाही. तशी गरज नसते. पण साधारणपणे 'can't' उच्चारताना त्यावर जोर दिला जातो.

Sian

That's right. And it’s pronounced 'can't. Let's practise the pronunciation.

can’t

can't wear shorts

we can't wear shorts.

Tejali
आता बघा, आपण - परवानगी मागतानाच्या उदाहरणांबद्दल बोलत होतो, त्यात आणखी एक क्रियापद ऐकलंय. आठवतंय का कुठलं? Let's listen again.

We're allowed to finish early on a Friday.

Tejali
बरं, म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आपल्याला परवानगी असेल तर आपण वापरतो  be allowed to. इथे एक लक्षात घ्या हं, याचाही अर्थ 'can' हाच आहे. आणि 'be allowed to' या नंतर तुम्हाला क्रियापदाचं मूळ रूप वापरायचं.   

Sian
But 'be allowed to' unlike 'can' does change its form – we need to change the form of the 'be' verb. So we say 'I'm allowed to' 'He's allowed to' 'they're allowed to'. Let's practise the pronunciation. 

Repeat after me.

Allowed

allowed to

I'm allowed to go home early.

She's allowed to go home early.

They're allowed to go home early.  

Tejali
एखाद्या गोष्टीची तुम्हाला परवानगी नसते, मग असं नकारार्थी वाक्य कसं तयार करायचं ते लक्षात आहे का तुमच्या? चला पुन्हा ऐकू या.

We're not allowed to smoke inside.

Sian
Yes so to make it negative we use the negative form of the verb 'be'. Let's quickly practise. Repeat after me.

I'm not allowed.    

she's not allowed.    

they're not allowed.  

Tejali
Thanks, Sian. आता एखाद्या गोष्टीची परवानगी आहे किंवा परवानगी नाही याबद्दल कसं बोलायचं हे तुम्हाला समजलंय तुम्हाला, फक्त आता सराव करूया.

एक छोटं उदाहरण ऐकू. समजा तुम्ही नवं घर घेतलं आहे आणि तुमचा मित्र तुम्हाला विचारतोय नव्या घरी काय काय गोष्टी करता येतात किंवा करता येत नाहीत. तुम्ही त्याला पहिल्यांदा सांगता, तुम्हाला त्या घरी पार्ट्या केलेल्या बिलकुल चालत नाहीत. यासाठी तुम्हाला शब्दप्रयोग वापरायचाय have parties. Party चं अनेकवचन parties.  हे दोन प्रकारे सांगता येईल, कसं त्याचा विचार करा, नंतर तुम्हाला शान दोन्ही उत्तरं सांगणार आहे.   

Sian
I can't have parties.

I'm not allowed to have parties.

Tejali
Great! पण तुमच्या या नव्या घरी तुम्ही पाळीव प्राणी मात्र ठेवू शकता, हेही तुम्ही तुमच्या मित्राला सांगा बरं. पुन्हा दोन प्रकारे सांगता येईलच. विचार करा आणि उत्तर द्या, नंतर शान तुम्हाला उत्तर सांगेल.

Sian
I can have pets.

I'm allowed to have pets.

Well done! Now you can talk about things you are allowed to do and things you are not allowed to do!

Tejali
पुन्हा भेटूया How do I च्या पुढच्या भागात Bye!

Sian
Bye!

Learn more

1. आपल्याला एखादी गोष्ट करण्याची परवानगी आहे, हे इंग्रजीत 'can' or 'be allowed to' चा वापर करून कसं सांगाल?

 • I can wear jeans to work.
 • I'm allowed to wear jeans to work.

2.  एखाद्या गोष्टीची परवानगी नाही हे कसं सांगणार?

यासाठी 'can' चं नकारार्थी रूप 'can't' वापरतात.  हे 'cannot' चं लघुरूप आहे.

 • We can't smoke inside.
 • We're not allowed to smoke inside.

3. दुसरं क्रियापद कशा प्रकारे असावं?

Can and 'be allowed to' नंतर योग्य क्रियापद वापरा. 

 • I can't arrive late.
 • I'm not allowed to make lots of noise.

How do I talk about permission at work?

3 Questions

Choose the correct option to respond to people’s news.
योग्य उत्तर निवडा.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

What things can you do at work or school and what things are you not allowed to do? Come and tell us on our Facebook group!
तुम्हाला शाळेत किंवा ऑफिस मध्ये कुठ-कुठल्या गोष्टी करण्याची परवानगी आहे किंवा नाही ते  आमच्या फेसबुक ग्रुपवर सांगा. 

Join us for our next episode of How Do I...? when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Session Vocabulary

 • jeans
  जीन्स 

  shorts
  अर्धी विजार 

  smoke
  धुम्रपान 

  have parties
  पार्टी करणे 

  have pets
  पाळीव प्राणी पाळणे