Learning English

Inspiring language learning since 1943

English Change language

Session 10

Listen to find out how to talk about your education.
आपल्या शिक्षणाबद्दल माहिती देताना कसं बोलायचं ते आजच्या भागात ऐकू.

Session 10 score

0 / 3

 • 0 / 3
  Activity 1

Activity 1

How do I talk about my education?

आजचा भाग ऐकण्याआधी Session Vocabulary ऐका.

Listen to check your answers. Then compare with the transcript below.

Show transcript Hide transcript

Tejali
बीबीसीच्या 'How do I..' मध्ये तुमचं स्वागत … मी तेजाली आणि माझ्यासोबत आहे सॅम

Sam
Hi, everybody.

Tejali
आजच्या भागात आपण .... तुम्हीच ओळखा आपण काय करणार आहोत ते. ही तीन वाक्यं ऐका आणि ते लोक कशाबद्दल सांगतायत ते समजून घ्या. ऐका.

 1. I started primary school when I was 6.
 2. I left high school when I was 18 to go to university.
 3. I graduated from Manchester University and I got a degree in engineering.
 4. I left secondary school when I was 16 and I went to college, where I got a certificate in business.

Tejali
ते त्यांच्या शिक्षणाबद्दल बोलतायत का?

Sam
Yes, they used lots of different ways to talk about education. So let’s have a closer look!

Tejali
आधी कशाला काय म्हणतात ते समजून घेऊ. ‘Primary school म्हणजे प्राथमिक शाळा, ‘secondary school’ म्हणजे माध्यमिक शाळा, ‘high school’ म्हणजे उच्च माध्यमिक शाळा. ‘college’ म्हणजे महाविद्यालय आणि ‘university’ म्हणजे विश्वविद्यालय. 

Sam
And what verbs did they use with these places? Let’s listen again – the verbs will come before the schools.

I started primary school when I was 6.
I left secondary school when I was 16 and I went to college.

Tejali
आपण काय काय ऐकलं? आपण ऐकलं ‘started’, म्हणजे सुरूवात झाली. ‘left’, म्हणजे सोडलं. इथे एक लक्षात घ्या, left हा leave चा भूतकाळ आहे. ‘Went to’, म्हणजे गेले होते. Went, goचा भूतकाळ आहे. 

Sam
And these verbs are all in the past simple. Shall we practise the pronunciation? Please repeat after me:

I started primary school when I was 6.

I left secondary school when I was 16…

…and I went to college.

Tejali 
आणि ‘went’ नंतर ‘to’ वापरलेलं लक्षात आलं का? पण एक लक्षात ठेवा की school च्या आधी ‘the’ वापरत नाहीत. पुन्हा ऐकू. Qualification बद्दल कुठले शब्द वापरलेत बघा. कुठलं क्रियापद दोन वेळा ऐकू येतंय. नीट लक्ष द्या. 

I graduated from Manchester University.

I got a degree in engineering.

I got a certificate in business.

Sam
Did you hear it? The verb they used twice was ‘got’.

Tejali
बरोबर. ‘Got a degree in engineering’ म्हणजे इंजिनीअरींगची पदवी मिळवली. ‘Got a certificate in business’ म्हणजे व्यापार विषयात प्रमाणपत्र मिळवले. कुठल्या विषयातपदवी घेतली हे सांगण्यासाठी ‘a degree’ आणि ‘a certificate’, यानंतर ‘in’ वापरतात. आपण आणखी एक शब्द वापरला ‘graduated’, म्हणजे शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करणे.

Sam
And after ‘graduated’, it’s important to remember to use ‘from’ before the name of the place. Let’s practise saying these altogether. Repeat after me:

I got a degree in engineering.

I got a certificate in business.

I graduated from Manchester University.

Tejali
Great! त्यांच्या वयाबद्दल कसं सांगितलं ऐकू या आता. 

I started primary school when I was 6.

I left high school when I was 18.

I left secondary school when I was 16.   

Tejali
ते म्हणाले ‘when I was’ आणि त्यापुढे त्यांनी त्यांच्या वयाचा आकडा सांगितला. म्हणजे जेव्हा मी सहा वर्षांची होते...

Sam
Let’s try it! Repeat after me:

When I was…

Tejali
OK, तुमच्या शिक्षणाबद्दल कसं बोलायचं ते समजलंय तुम्हाला. आता तुम्हाला सराव करायचा आहे. तुम्ही शाळेत जायला लागलात तेव्हा आणि शाळा सोडली तेव्हा, तुमचं वय किती होतं? हे सांगायचंय. कसं सांगाल? यासाठी तुम्हाला ‘started’, ‘left’ हे शब्द वापरायचे आहेत. विचार करून उत्तर द्या आणि नंतर सॅमचं उत्तरही ऐका.

Sam
I started primary school when I was 6.

Tejali
आता सांगा, you got ‘a certificate in’ something. तुम्हाला  हवा तो विषय निवडा. इथे कुठलं क्रियापद वापराल? विचार करा आणि नंतर सॅमचं उत्तरही ऐका.  

Sam
I got a certificate in teaching.

Tejali 
Is it true, Sam?

Sam
Yes, it is! And now you can talk about your education, as well.

Tejali
आज इथेच थांबूया, आणखी शिकण्यासाठी पुन्हा भेटूया How do I च्या पुढच्या भागात. Bye!

Sam
Bye bye!

Learn more!

1. शाळा, कॉलेजासंदर्भात बोलताना कसं बोलणार? 

यासाठी ‘started’ म्हणजे सुरूवात केली, ‘left’ म्हणजे सोडली/ सोडलं आणि ‘went to’ म्हणजे गेलेले हे शब्द वापरू शकता. हे सर्व भूतकाळ आहेत. ‘Started’ हा ‘start’ चा साधा भूतकाळ म्हणजे past simple आहे. ‘left’ हा ‘leave’ चा साधा भूतकाळ म्हणजे past simple आहे आणि ‘went to’ हा ‘go to ’चा साधा भूतकाळ म्हणजे past simple आहे .

I started primary school when I was 6.
I left secondary school when I was 16 and I went to college.
 

वर्तमान काळासाठी ‘go to’ किंवा ‘be in’ वापरता येतं :

My little brother goes to secondary school.
My little brother’s in secondary school.

‘To attend’ हा आणखी एक पर्याय आगे. पण ते जास्त औपचारिक वाटतं. 

He attended Bristol University. 

2. शाळा, कॉलेज याच्या आधी ‘the’ वापरतात का?

या क्रियापदांच्या नंतर तुम्ही शाळेत जाता की कॉलेजात जाता ते सांगता. यासाठी ‘the’ वापरत नाहीत. ‘the’ चा वापर शाळा-कॉलेजाचं विशिष्ट नाव सांगताना करतात.

They go to the London School of Economics.
She went to the University of Manchester.
I left the College of West Anglia when I was 18.

3. शैक्षणिक अर्हतेबद्दल सांगताना कसं सांगाल?

याचे तीन प्रकार आहेत:

a certificate : प्रमाणपत्र
a diploma: पदविका
a degree :पदवी

याबद्दल सांगताना या शब्दांच्या आधी ‘get’ चा भूतकाळ ‘got’ वापरतात. यासाठी ‘to graduate’ किंवा त्याचं भूतकाळी रूप ‘graduated’ देखील वापरता येईल.

त्यानंतर 'in' वापरून त्यापुढे संबधित विषय सांगा.
कुठल्या ठिकाणाहून डिग्री घेतली हे सांगण्यासाठी ‘from’ वापरतात.

I got a degree in engineering from Sheffield University.
I graduated in engineering from Sheffield University.

4. वयाबद्दल कसं बोलाल?

वयाबद्दल सांगताना ‘when I was’ असं म्हणून पुढे वयाचा आकडा सांगायचा. किंवा ‘at the age of’ आणि मग पुढे त्या वेळंच वय सांगायचं.

I started primary school when I was 6.
I started primary school at the age of 6.

How do I…talk about my education?

3 Questions

Choose the correct option to fill the gap.
रिकाम्या जागा भरा.

Congratulations you completed the Quiz
Excellent! Great job! Bad luck! You scored:
x / y

Tell us about your education and qualifications on our Facebook group!
तुमचं शिक्षण कुठपर्यंत झालंय ते आमच्या फेसबुक पेजवर सांगा

Join us for our next episode of How Do I...?, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात.

Session Vocabulary

 • primary school
  प्राथमिक शाळा 

  secondary school
  माध्यमिक शाळा 

  college
  महाविद्यालय 

  university
  विश्वविद्यालय 

  engineering
  अभियांत्रिकी  

  business
  व्यापार