1

Bài 1: Essential English Conversation

Bộ phận chọn bài

 1. 1 Essential English Conversation

Phần 29

Listen to find out how to ask what time it is.
एखाद्याला वेळ कशी विचाराल?

0 / 3

 • 0 / 3
  Bài tập 1

Bài tập 1

किती वाजलेत?

Listen to find out how to ask what time it is.
एखाद्याला वेळ कशी विचाराल?

Listen to the audio and take the quiz. हे ऐका आणि क्वीझ सोडवा

Hiển thị văn bản ghi âm (hay video) Giấu văn bản ghi âm (hay video)

Tejali
नमस्कार मित्रांनो...बीबीसीच्या Essential English Conversation वर्गात मी तुमचं स्वागत! मी तेजाली...

आजच्या भागात आपण वेळ कशी विचारायची ते शिकणार आहोत.

Sian
Hi Phil, what time is it?

Phil                                        
It’s eight forty-five.

Sian
Aaargh, I start work at ten to nine….. I’m late! Bye!

Phil
Bye!

Tejali
शानने फिलला विचारलं, किती वाजलेत?  हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.

What time is it?

Tejali 
फिल म्हणाला eight forty five, म्हणजे पावणे नऊ वाजलेत. Eight म्हणजे आठ, forty five पंचेचाळीस

वेळ सांगताना तास आणि मिनिटे अशी सांगायची, eight म्हणजे आठ वाजून forty five पंचेचाळीस मिनिटे. हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा

It’s eight forty-five.

Tejali
शान म्हणाली aaargh. काळजी दाखवण्यासाठी ती असं म्हणाली. ती म्हणाली ती नऊला दहा मिनीटे कमी असताना काम सुरु करते, म्हणजे start work.
तास संपायला 30 मिनिटांपेक्षा कमी वेळ असेल, तर तास  संपायला किती मिनिटे बाकी आहेत ते सांगतात.
Ten to nine म्हणजे नऊवाजायला दहा मिनिटे बाकी आहेत, म्हणजेच आठ वाजून पन्नास मिनिटे, eight fifty झाले आहेत. हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.

Aaargh, I start work at ten to nine.  

Tejali
मग शान म्हणाली, तिला late, उशीर झालाय आणि म्हणाली, Bye. हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा

I’m late! Bye!

Tejali
मस्त, आता इतर लोक कसं सांगतायत ते ऐकू.

दुपारी एक वाजायला वीस मिनिटेबाकी आहेत, twenty to one आणि केविनला जेवायला म्हणजे lunch ला  उशीर म्हणजे lateझालाय.  

Hi Kevin, what time is it?

It’s twenty to one.

I usually have lunch at twelve, I’m late!

सकाळचे आठ वाजून वीस मिनीटे, eight twenty झालेत, आणि रेचल कामावर लवकर आली आहे. 

Hi Rachel, what time is it?

It’s eight twenty.

I start work at nine o’clock, I’m early!

Tejali
चला परत करूया. ही इंग्रजी वाक्य ऐका आणि त्यामागोमाग म्हणा.  

What time is it? 

It’s eight forty-five.

Aaargh, I start work at ten to nine   

I’m late! Bye! 

Bye! 

Tejali
एकदम मस्त. बघू या तुमच्या काय काय लक्षात राहिलंय. ही मराठीतली वाक्य ऐका आणि ती इंग्रजीत कशी म्हणाल सांगा.

किती वाजलेत?
What time is it?

पावणे नऊ झालेत.
It’s eight forty-five

मी नऊला दहा मिनिटे आहेत.
I start work at ten to nine.

मला उशीर झालाय.
I’m late! Bye!

Tejali
आता एखाद्याला वेळ कशी विचारायची ते समजलंय तुम्हाला. शानच्या प्रश्नांना उत्तर देऊन प्रॅक्टिस करा.

What time is it?    

Tejali
छान आता सगळं संभाषण परत ऐका आणि तुमची उत्तरं तपासून पहा.  

Sian
What time is it?

Phil
It’s eight forty-five.

Sian
Aaargh, I start work at ten to nine….. I’m late! Bye!

Phil
Bye!

Tejali
आता एखाद्याला इंग्रजीत वेळ कशी सांगायची किंवा विचारायची ते समजलंय तुम्हाला, सराव करत राहा, पुन्हा भेटू Essential English conversations च्या पुढच्या भागात. Bye. 

Check what you’ve learned by choosing the correct answer to the question.
रिकाम्या जागा भरा.

किती वाजलेत?

3 Questions

Choose the correct answer.

Chúc mừng bạn đã hoàn thành Trắc nghiệm
Excellent! Bạn làm rất tốt! Bad luck! Điểm bạn đạt được:
x / y

Join us for our next episode of Essential English, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात. असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी! धन्यवाद!

Session Vocabulary

 • What time is it?
  किती वाजले आहेत?

  It’s ______.
  ______वाजलेत.

  I start work at ______.
  मी  ______वाजता काम सुरु करतो .

  I usually have lunch at ______.
  मी दुपारी  ______वाजता जेवतो. .

  I’m early!
  मी लवकर आलो.

  I’m late!
  मला उशीर झालंय.

  eight forty-five
  आठ-पंचेचाळीस/ पावणे नऊ

  ten to nine
  नऊ वाजायला दहा मिनिटे आहेत.

  twenty to one
  एक वाजायला वीस मिनिटे.

  twelve
  बारा

  eight twenty
  आठ वाजून वीस मिनिटे

  nine o’clock
  नऊ वाजले