1

Unit 1: Essential English Conversation

Select a unit

  1. 1 Essential English Conversation

Session 13

Listen to find out how to ask for directions.
रस्ता कसा विचारायचा?

ክፍለ-ስራሓት ናይዚ ምዕራፍ

ድምር ነጥቢ ናይዚ ክፍለ-ስራሓት 13

0 / 3

  • 0 / 3
    Activity 1

Activity 1

तिकडे कसं जायचं?

Listen to find out how to ask for directions.
रस्ता कसा विचारायचा?

Listen to the audio and take the quiz. हे ऐका आणि क्वीझ सोडवा

ነቲ ቅዳሕ ጽሑፍ ኣርእይዎ ነቲ ቅዳሕ ጽሑፍ ሕብእዎ

Tejali
नमस्कार मित्रांनो. मी तेजाली...बीबीसीच्या Essential English Conversation वर्गात तुमचं स्वागतकरते!
इथे आपण शिकतो रोजच्या वापरासाठी साधं सोपं इंग्रजी. एखाद्या ठिकाणी कसं जायचं हे इंग्रजीत कशा प्रकारे विचारायचं ते या भागात आपण शिकणार आहोत.
फिल सॅमला सुपरमार्केटला कसं जायचं विचारत आहे.

Phil
How do I get to the supermarket?

Sam
Turn left, go straight on, turn right, it’s on Queen Street.

Phil
Thanks!

Tejali
चला प्रॅक्टीस करू. फिलने विचारलं सुपरमार्केटला कसं जायचं? त्यासाठी त्याने म्हटलं, How do I get to… आणि मग पुढे जोडलं the supermarket. म्हणजे How do I get to the supermarket. आताहा प्रश्न ऐका आणि त्यापाठोपाठ म्हणा.

How do I get to the supermarket?

Tejali
मग सॅमने त्याला कसं जायचं ते सांगितलं. ती म्हणाली, डावीकडे वळ, turn left, मग सरळ जा go straight on, आणि मग उजवीकडे वळ, turn right. ही वाक्य ऐका आणि त्यापाठोपाठ म्हणा.

Turn left.

Go straight on.

Turn right.

Tejali
तिने सांगितलं, ते क्वीन स्ट्रीटवर आहे. ती म्हणाली, it’s on , on म्हणजे वर क्वीन रस्त्यावर आहे. वाक्य ऐका आणि त्यापाठोपाठ म्हणा.

It’s on Queen Street.

Tejali
त्यावर फिल म्हणाला, thanks, मदत केल्याबद्दल धन्यवाद, आता हे ऐकून त्यामागे म्हणा.

Thanks.

Tejali
छान केलंत.आता इतर लोक याचं उत्तर कसं देतात ऐका. पिटला बँकेत जायचं आहे.

How do I get to the bank?

Turn right, go straight on, turn left, it’s on Perth Road. 

Thanks!

क्लेअरला पोस्ट-ऑफिसमध्ये जायचं आहे.

How do I get to the post office?

Go straight on, turn right, turn left, it’s on South Street. 

Thanks!

Tejali
चला परत करू या? ही इंग्रजी वाक्य ऐका आणि त्यामागे म्हणा.

How do I get to the supermarket?

Turn left. 

Go straight on.

Turn right.

It’s on Queen Street.

Thanks!

Tejali
वा... जमतंय की. ही मराठीतली वाक्य ऐका आणि ती इंग्रजीत कशी म्हणाल ते सांगा बघू या तुमच्या काय काय लक्षात राहिलंय. सुपरमार्केटला कसं जायचं?

How do I get to the supermarket?

डावीकडे वळ

Turn left.

मग सरळ जा

Go straight on.

उजवीकडे वळ

Turn right.

ते क्वीन स्ट्रीटवर आहे

It’s on Queen Street.

धन्यवाद! 

Thanks! 

Tejali
मस्त...आता तुम्हाला इंग्रजीमध्ये, एखाद्या ठिकाणी कसं जायचं ते विचारता येईल. आता फिलच्या प्रश्नांना उत्तर देऊया. बघू या काय काय समजलंय.

How do I get to the supermarket?

Thanks!

Tejali
आता हे सगळं ऐका, आणि बघा तुमचं उत्तर तपासून.

Phil
How do I get to the supermarket? 

Sam
Turn left, go straight on, turn right, it’s on Queen Street.

Phil
Thanks!

Tejali
छानच. आता परक्या ठिकाणी गेल्यावर पत्ता, रस्ते, दिशा इंग्रजीत विचारताना तुमची पंचाईत होणार नाही. मित्र मैत्रिणींना प्रश्न विचारून प्रक्टीस करत रहा. पुन्हा भेटू Essential English च्या पुढच्या भागात. तोपर्यंतBye!  

Check what you’ve learned by choosing the correct answer to the question.
योग्य पर्याय निवडा, बघू या काय काय समजलंय तुम्हाला.

तिकडे कसं जायचं?

3 Questions

योग्य उत्तर निवडा
Choose the correct answer.

ኣገናዕ፡ ፈተናኹም ዛዚምኩም
Excellent! Great job! ሕማቕ ዕድል! ዘመዝገብኩምዎ ነጥቢ ...:
x / y

Join us for our next episode of Essential English, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात. असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी! धन्यवाद!

Session Vocabulary

  • How do I get to ______?
    ____कसं जायचं ?

    the supermarket
    सुपर मार्केट

    the bank
    बँक

    the post office
    पोस्ट ऑफिस ce

    Go straight on.
    सरळ जा.

    Turn right.
    उजवीकडे वळ.

    Turn left.
    डावीकडे वळ.

    It’s on ______.
    ते ____वर आहे (रस्त्यावर)

    Thanks!
    धन्यवाद