1

Unidad 1: Essential English Conversation

Seleccione una unidad

 1. 1 Essential English Conversation

Sesión 21

Listen to find out how to ask for size and colour when shopping for clothes.

Sesión 21 puntuación

0 / 3

 • 0 / 3
  Actividad 1

Actividad 1

Size and colour

माप आणि रंग

Listen to find out how to ask for size and colour when shopping for clothes.

दुकानात गेल्यावर आपल्याला हव्या त्या रंगाचे मापाचे कपडे कसे मागायचे?

Listen to the audio and take the quiz. हे ऐका आणि क्वीझ सोडवा

Mostrar la transcripción Ocultar la transcripción

Tejali
नमस्कार मित्रांनो, बीबीसीच्याEssential English Conversationवर्गात तुमचं स्वागत. आजपासून सुरवात होणारे एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयाची.. Shopping. सगळीकडे एवढे मोठमोठे मॉल्स झालेत, तिथल्या चकचकीत दुकानात जाऊन शॉपिंग करायचा मोह होतोच, पण तिकडे गेल्यावर इंग्रजीत कसं बोलणार? चला आजपासून शिकायला सुरूवात करू...

Shop assistant

Can I help you?

Dan

Yes, do you have these shoes in size 9?

Shop assistant

No, but we have them in size 8 and 10.

Tejali
आता आधी दुकानदाराने विचारलं, ‘Can I help you.'  आपण गेल्या भागात ऐकलेलं ना? हे ऐकून त्या पाठोपाठ म्हणा.

'Can I help you?'Tejaliत्यावर डॅनने विचारलं, ‘Yes, do you have these shoes in size 9?' म्हणजे तुमच्याकडे 9 नंबरचा बूट आहे का? आता त्यात दुसरा रंग किंवा दुसरी साईझ मागायची असेल तर ‘Do you have these in…?'असं विचारतात. एकाच वस्तूबद्दल विचारायचा असेल तर thisम्हणतात. Theseहे thisचं अनेकवचन आहे.

आता त्यात काळा रंग किंवा 8 नंबर आहे का विचारायचं असेल तर .....
Do you have these shoes in black?

Do you have these in size 8?

असं विचारता येईल.

आता हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.

Yes, do you have these shoes in size 9?

Tejali
दुकानदार म्हणाला, नाही पण आठ आणि दहा नंबर आहे त्यात. आता हे ऐकून त्यापाठोपाठ म्हणा.

  
No, but we have them in size 8 and 10.


Tejali
आता इतर लोक कसं बोलत आहेत ऐकू.

Can I help you?

 

Yes, do you have these trousers in black?

 

No, but we have them in brown.

 

Can I help you?

 

Yes, do you have these sunglasses in white?

 

No, but we have them in silver

 

Tejali
आता परत करूया. ही इंग्रजी वाक्यं ऐका आणि त्यामागोमाग म्हणा.

Can I help you?

 

Yes, do you have these shoes in size 9?

 

No, but we have them in size 8 and 10.

 

 Tejali
आता बघू तुमच्या काय काय लक्षात राहिलंय. ही वाक्यं ऐका आणि ती इंग्रजीत कशी म्हणाल ते सांगा. त्या पाठोपाठ म्हणा. 

मी तुम्हाला काय मदत करू शकते?

Can I help you?

तुमच्याकडे 9 नंबरचा बूट आहे का?

Yes, do you have these shoes in size 9?

नाही पण आठ आणि दहा नंबर आहे त्यात.

No, but we have them in size 8 and 10.

Tejali
आता शॉपिंग करताना हव्या त्या मापाचे बूट, कपडे कसे मागायचे ते तुम्हाला समजलंय. आता दुकानदाराकडे सात नंबरचे मोजे मागा.

Can I help you?

No, but we have them in size 8 and 10.

Tejali
तुम्ही काय उत्तर दिलंय ते तपासू. हे ऐका.

Shop assistant

Can I help you?

Dan

Yes, do you have these shoes in size 9?

Shop assistant

No, but we have them in size 8 and 10.

Tejali

आता तुम्ही दुकानात गेल्यावर तुम्हाला हव्या त्या मापाचे आणि रंगाचे कपडे मागण्यासाठी इंग्रजीत काय बोलायचं ते समजलं आहे तुम्हाला. प्रॅक्टिस करत राहा . पुन्हा भेटू  Essential English Conversationsच्या पुढच्या भागात. Bye!

Check what you’ve learned by choosing the correct answer to the question.

 

 

रिकाम्या जागा भरा.

3 Questions

Choose the correct answer.
योग्य पर्याय निवडा.

Felicitaciones. Has completado el quiz.
Excellent! ¡Muy bien! Bad luck! Tu puntaje :
x / y

Join us for our next episode of Essential English, when we will learn more useful language and practise your listening skills.
पुन्हा भेटू पुढच्या भागात. असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी! धन्यवाद!

Sesión de vocabulario

 • Yes, do you have these ______ in ______?
  हो. हे तुमच्याकडे --------- आणि -------- मध्ये आहेत का?

  Do you have these in ______?
  हे तुमच्याकडे --------- मध्ये आहेत का?

  Do you have these ______ in ______?
  तुमच्याकडे हे --------- --------मध्ये आहेत का?

  No, but we have them in ______.
  नाही, पण आमच्याकडे हे------------- मध्ये आहेत.

  trousers
  ट्राऊझर्स

  sunglasses
  सनग्लासेस

  shoes
  शूझ

  size 8
  साईझ 8

  brown
  ब्राऊन

  silver
  सिल्वर

  black
  काळा