1

Урок 1: Essential English Conversation

Подбор уроков

 1. 1 Essential English Conversation

Сеанс работы 3

Listen to find out how to tell someone what your job is.

एखाद्याला त्याच्या व्यवसायाबद्दल कसं विचारायचं ? चला ऐकू या.

Сеансы работы в этом уроке

0 / 3

 • 0 / 3
  Упражнение 1

Упражнение 1

What do you do? तू काय करतोस?

Listen to find out how to tell someone what your job is.

काय करता तुम्ही?... कसं उत्तर द्याल.. चला ऐकू या.

Listen to the audio and take the quiz. हे ऐका आणि क्वीझ सोडवा

Показать текст Скрыть текст

नमस्कार मित्रांनो...
मी तेजाली...बीबीसीच्या Essential English Conversation वर्गात तुमचं स्वागत करते !!!
इथे आपण शिकतो रोजच्या वापरासाठी साधं सोपं इंग्रजी.

या भागात आपण, एखाद्याला ‘आपण काय करता?’ हे इंग्रजीत कसं विचारायचं हे शिकणार आहोत.

अमॅंडा आणि जेम्सचा संवाद ऐकूया.

Amanda
Hi, James! What do you do?

James
I’m an engineer. How about you, Amanda?

Amanda
I’m a farmer.

चला, एक एक शब्द समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला नीट कळेल. आधी अमॅंडानं जेम्सला विचारलं, तू काय करतोस? म्हणजे “What do you do?”
एखाद्याला त्याच्या नोकरी किंवा व्यवसायाबद्दल विचारायचं असेल तर इंग्रजीत “What do you do?” असं विचारतात.

आता हे ऐका आणि.. त्यामागे तसंच बोला.

What do you do?

जेम्स म्हणाला , तो इंजिनीयर आहे “He is an engineer”. तुम्ही म्हणा, मी ‘I’m’ आणि पुढे तुमचा व्यवसाय सांगा. उदा. I am doctor किंवा I am teacher.
आता एक लक्षात घ्या. A, E, I, O, U ही इंग्रजी मुळाक्षरे आहेत. यांनी सुरू होणाऱ्या इंग्रजी शब्दांच्या आधी AN लिहीतात. जसं की An Apple, An inquiry, An Opinion, An umbrella, An elephant.

आता हे ऐकुया आणि... त्यामागे तसंच बोला.

I’m an engineer.

मग त्याने अमॅंडाला तेच विचारंल. जर समोरच्याला तोच प्रश्न विचारायचा असेल तर “How about you?”असं विचारु शकतो. आता हे ऐकुन त्यामागे म्हणा.

How about you?

अमॅंडा शेतकरी आहे. त्यामुळे ती म्हणाली, “मी” म्हणजे “I am” शेतकरी आहे.” “a farmer.”

I’m a farmer.

तुम्ही काय करता? चला इतरांनी दिलेली उत्तरं ऐकू.

मी ड्रायव्हर आहे.
I’m a driver.

मी नर्स आहे.
I’m a nurse.

मी शेफ आहे.
I’m a chef.

आता आणखी काही उदाहरणं बघूया.
क्लॅरा शिक्षक “a teacher” आहे. आणि अॅलिस विक्रेती “a salesperson” आहे.

Hi, Claire! What do you do?
I’m a teacher. How about you, Alice?
I’m a salesperson.

मार्क बिल्डर आहे. आणि पीट डॉक्टर आहे.

Hi, Mark! What do you do?
I’m a builder. How about you, Pete?
I’m a doctor.

चला.. परत एकदा ऐकू. त्यामागोमाग तुम्ही म्हणा. तुम्हाला वाक्य दोन वेळा ऐकायला येईल.

Hi, James! What do you do?
.
.
Hi, James! What do you do?

I’m an engineer.
.
.
I’m an engineer.

How about you, Amanda?
.
.
How about you, Amanda?

I’m a farmer.
.
.
I’m a farmer.

आता ही मराठीतली वाक्य ऐका आणि इंग्रजीत बोला. बघूया तुमच्या काय काय लक्षात राहिलंय ते!

हाय जेम्स, तू काय करतोस ?
Hi, James! What do you do?

मी इंजिनीयर आहे.
I’m an engineer.

तू काय करतेस अमॅंडा ?
How about you, Amanda?

मी शेतकरी आहे
I’m a farmer.

छान.. आता तुम्हाला नीट कळलंय. आता अमॅंडाच्या प्रश्नांना उत्तर द्या आणि बघा कसं जमतंय.

Hi, what do you do?


I’m a farmer.

सुंदर.. आता हे संभाषण परत ऐका आणि तुमचं उत्तर तपासून बघा .

Amanda
Hi, James! What do you do?

James
I’m an engineer. How about you, Amanda?

Amanda
I’m a farmer.

वा मस्त केलंत. आता तुम्हाला तुमच्या नोकरी धंद्याबद्दल इंग्रजीत सांगता येईल. जे शिकलात ते लक्षात ठेवा. मित्र-मैत्रिणींना प्रश्न विचारा आणि त्यांनाही तुम्हाला प्रश्न विचारायला सांगा. आणि उत्तर देण्याचा सराव करत रहा.

पुन्हा भेटू पुढच्या भागात... असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी!!!
धन्यवाद!!!

 

Check what you’ve learned by choosing the correct answer to the question.

योग्य पर्याय निवडा, बघूया काय काय समजलंय तुम्हाला!

What do you do? योग्य पर्याय निवडा.

3 Questions

Choose the correct answer.

रिकाम्या जागा भरा.

Поздравления
Excellent! Отлично! Bad luck! Вы набрали:
x / y

Join us for our next episode of Essential English, when we will learn more useful language and practise your listening skills.

पुन्हा भेटू पुढच्या भागात... असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी!!!

धन्यवाद!!!

Сеанс работы над лексикой

 • What do you do?
  तुम्ही काय करता?

  I’m _______.
  मी _____ आहे.

  How about you?
  आणि तुम्ही? / आणि तू ?

  an engineer
  इंजिनियर, अभियंता 

  a farmer
  शेतकरी 

  a driver
  ड्रायव्हर

  a nurse
  नर्स, परिचारिका

  a chef
  शेफ 

  a teacher
  शिक्षक

  a salesperson
  विक्रेता 

  a builder
  बांधकाम व्यावसायिक 

  a doctor
  डॉक्टर