1

Unit 1: Essential English Conversation

Select a unit

 1. 1 Essential English Conversation

Session 1

Listen to find out how to ask for names and say your names

इंग्रजीतून कशी स्वत:ची ओळख करून द्याल?

በዚህ ክፍል ያሉ ክፍለ ጊዜያት

ክፍለጊዜያት 1 ነጥብ።

0 / 3

 • 0 / 3
  Activity 1

Activity 1

माझं नाव (EPISODE/भाग 1/20)

शिकूया इंग्रजीतून स्वत:ची ओळख करून द्यायला! 

Listen to find out how to ask for names and say your names

हे ऐका आणि क्वीझ सोडवा.

ፅሁፍ አሳይ ፅሁፍ ደብቅ

नमस्कार मित्रांनो...
मी तेजाली...बीबीसीच्या Essential English Conversation वर्गात तुमचं स्वागत करते!!!
इथे आपण शिकतो रोजच्या वापरासाठी साधं सोपं इंग्रजी.

या भागात आपण, आपली ओळख इंग्रजीत कशी करून द्यायची ते शिकणार आहोत.
शान आणि फिल पहिल्यांदाच भेटतायत. त्यांचा संवाद ऐकूया.

Sian
Hello, I'm Sian. What's your name?
Phil
Hi. My name's Phil. Nice to meet you.
Sian
Nice to meet you too!

कळलं नाही तरी हरकत नाही. आपण एक एक शब्द बघू आणि प्रॅक्टीस करू.
आधी शान म्हणाली, ” हॅलो, मी शान” ‘Hello I’m Sian. तुम्ही म्हणा, 'Hello I'm…मग तुमचं नाव म्हणा.
हे ऐका आणि त्यामागे म्हणा--

Hello, I'm Sian
.
आपण, “माझं नाव.... आहे”, म्हणजे “My name is…” असंही म्हणू शकतो.
Hello, My name is Sian.

मग शानने फिलला विचारलं ‘what’s your name?’ म्हणजे ”तुझं नाव काय’’?

ऐका आणि त्यामागे म्हणा.
What's your name?
.

फिल ने आपली ओळख करून देताना वेगळे शब्द वापरले. तो म्हणाला 'my name is'
म्हणजे माझं नाव ....आहे. त्याऐवजी आपण ‘I’m..’ किंवा ‘my name’s…’म्हणू शकतो.
जसं की “मी … ” किंवा “माझं नाव … आहे.”

ऐका आणि त्यामागे म्हणा.
My name's Phil
.
I’m Phil
.
मग ते दोघं म्हणाले, 'nice to meet you'. म्हणजे छान वाटलं भेटून.
Nice to meet you.
.
पण फिलने ‘too’ जोडलं. ‘too’ म्हणजे सुद्धा. एखाद्याला दूजोरा देण्यासाठी वाक्याच्या शेवटी ‘too’ वापरता येतं. उदा. मी पण, मला सुद्धा.

Nice to meet you too.

मस्त! आता हे ऐका आणि तुम्ही बोललेलं तपासून बघा.

Hi, I'm Pete. What's your name?
Hi. My name's Mark. Nice to meet you.
Nice to meet you too!

Hi, I'm Alice. What's your name?
Hi. My name's Claire. Nice to meet you.
Nice to meet you too!

बरं. परत एकदा करूया. ही वाक्य ऐका आणि त्या मागोमाग म्हणा.
Hello, I'm Sian. What's your name? .
.
Hi. My name's Phil. Nice to meet you.
.
Nice to meet you too!
.
छान! बघुया तुमच्या काय काय लक्षात राहिलंय.
आपण आता मराठीत ऐकूया आणि तुम्ही मग ते इंग्रजीमध्ये बोला.

हॅलो मी शान.
.
Hello, I’m Sian.

तुझं नाव काय?
.
What’s your name?

माझं नाव फिल आहे.
.
Hi. My name’s Phil.

छान वाटलं भेटून!!!
.
Nice to meet you.

मला पण छान वाटलं.
.
Nice to meet you too.

झकास!!! आता इंग्रजीमधे आपलं नाव कसं सांगायचं आणि विचारायंच ते कळलंय तुम्हाला.
आता शानच्या प्रश्नाला उत्तर देउन सराव करूया.

“Hello, I’m Sian. What’s your name?”
[Pause]
“Nice to meet you too!”

Great, आता सगळं परत ऐका आणि तुमचं उत्तर तपासून बघा.

Sian
Hello, I'm Sian. What's your name?
Phil
Hi. My name's Phil. Nice to meet you.
Sian
Nice to meet you too!

छान! आता तुम्ही इंग्रजीमघ्ये तुमचं नाव सांगू शकता आणि दुसऱ्यांना नाव विचारूही शकता. जे शिकलात ते लक्षात ठेवा.. नातेवईक, मित्र-मैत्रिणींबरोबर त्याचा सराव करत रहा....आणि ‘Nice to meet you!’ म्हणायला विसरू नका.
पुन्हा भेटू पुढच्या भागात... असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी!!!
धन्यवाद!!!

 

What's your name?

3 Questions

प्रश्नोत्तरांचा तास 

Check what you've learned by selecting the correct answer to each question.

እንኳን ደስ ያለዎ ሙከራውን አጠናቀዋል
Excellent! Great job! መጥፎ እድል ነጥብ አስመዝግበዋል :
x / y

पुन्हा भेटू पुढच्या भागात... असंच रोजच्या वापरातलं साधं सोपं इंग्रजी शिकण्यासाठी!!!

धन्यवाद!!!

Join us for our next episode of Essential English to talk about where you come from.

Session Vocabulary

 • hello
  हॅलो 

  hi 
  हाय

  name 
  नाव

  nice 
  छान

  meet
  भेटणे

  you 
  तू , तुम्ही